महातारदेवी सरपंचपदी सौ. संध्या पाटील यांची निवड

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

घुग्घुस : परिसरातील महातारदेवी ग्रामपंचायतीवर काँग्रेस पक्षाने नऊ पैकी सात सदस्य निवडून बहुमत घेतले आहे.

माजी सरपंच सौ. प्रिया गोहणे यांनी खाजगी कारणास्तव पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर ग्रामपंचायत महातारदेवी येथे नायब तहसीलदार जितेंद्र गादेवार, ग्रामसेवक राजेश उगले यांच्या उपस्थितीत सौ.संध्या रवींद्र पाटील यांची सरपंचपदी निवड करण्यात आली.

याप्रसंगी नवनियुक्त सरपंच, उपसरपंच यांचे घुग्घुस काँग्रेस कमिटी अध्यक्ष राजूरेड्डी, कामगार नेते सैय्यद अनवर यांनी पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले.
ग्रामपंचायत उपसरपंच शंकर उईके, संजय टिपले सदस्य सौ. अस्मिता पाझारे, सौ.प्रिया गोहणे,सौ. मंगला देहारकर, संदीप चांभारे,माजी सरपंच दीपक सावे, बबन सावे माजी तंटा मुक्त समिती अध्यक्ष, सिद्धार्थ बोरकर, अमोल आत्राम, सरिता टिपले माजी सदस्य,सचिन मांढवकर माजी सदस्य, सचिन सावे, जगन्नाथ चटप,गुरुदेव सेवा मंडळ अध्यक्ष व मोठ्या संख्येने गावातील नागरिकगण उपस्थित होते.