रावण दहन प्रथा बंद करण्यात यावी,  आदिवासी समाजाची एकमुखी मागणी

चंद्रपूर : शतकांपासुन दसऱ्याच्या दिवशी रावणाच्या प्रतिमेचे अत्यंत तिरस्काराने दहण करण्यात येते समाजात ही प्रथा अज्ञान व अविचाराणे रूढ झाली परंतु ज्ञानाच्या स्पोटामुळे विवेकाची प्रभा फाकली व सत्य बाहेर येऊ लागले. महाराज रावण हे गौंड गणाचे अधिपती होते. त्या काळाचा गौंड गण म्हणजे दैत्य, दाणव व राक्षस तर आजचा आदिवासी समाज होय त्यामुळे महाराजा रावण हे आदिवासी समाजाचे आदिपुरूष ठरतात ते आदिवासी समाजाचे श्रद्धास्थान आहे. भारताच्या बऱ्याच भागात महाराजा रावण यांची मनोभावे पुजा करण्यात येते इतकेच नाही तर महाराजा रावण प्रकांड पंडीत होते. विविध शास्त्रांचे प्रचंड ज्ञान असून धर्मशास्त्रात पारंगत होते. त्यामुळे महाराजा रावण मृत्यू शय्येवर असतांना श्रीरामांनी आपल्या धाकट्या भावाला लक्ष्मणाला राजशिष्टाचार, नितीशास्त्राचे धडे घेण्यासाठी रावणाकडे पाठविले होते.

स्वतःच्या बहिणीचा अपमानाचा बदला घेण्यासाठी प्रतिपक्षाच्या अतिशय प्रिय व्यक्ती सितेचे अपहरण करणे व अशोक वाटीकेत बंदीस्त करणे यामुळे महाराजा रावण तिरस्कारास पात्र ठरत नाहीत. अधर्म व दृष्कृत्य आपण ज्याला समजतो त्याची प्राचीण वाडःमयात प्रचीती येते . मग रावणाने केलेले अपहरण हे अधर्म कसे ? रावणाने केलेले कृत्य एखाद्या भावाला व सर्वशक्तीमान सम्राटाला शोभेसेच होते. आपल्या चुका लपविण्यासाठी त्याचे खापर दुसऱ्यावर फोडण्याची मानवी प्रवृत्तीच आहे. महाराजा रावणाबाबत हे घडले आहे आणि यामुळे महाराजा रावणाबाबत चालत आलेला तिरस्कार व त्यांच्या प्रतिमेचे दहण निंदणीय ठरते. ज्या महाराजा रावणाच्या प्रतिमेचे की जे बहुजनांचे श्रद्धास्थान आहे, दहण डोळ्यासमोर होत असेल तर कोण सहन करणार ? काळ झपाट्याने बदलत आहे, ज्ञानाच्या कक्षा दिवसेंदिवस रुंदावत आहेत आणि अशा परिवर्तनशिल काळात आपल्या अमानुष प्रथा समाज पाळत असेल तो समाज अधोगतीला गेल्याशिवाय राहणार नाही. अशा अंध समाजाचा काय उपयोग ? असा सवाल जागर चे अध्यक्ष अशोक तुमराम यानी पत्रपरिषदेत उपस्थित केला.

चंद्रपुरातील समाजसेवक भुषण फुसे म्हणाले की ज्या कृतीने बहुसंख्य समाज बांधवांच्या भावना दुखावत असतील तर त्या प्रथा तात्काळ बंद कराव्यात अन्यथा सामाजिक स्वास्थ्य व सलोखा बिघडण्याची शक्यता अधिक असते. तेव्हा महाराजा रावणाच्या प्रतिमेचे दहन करण्याची ही कुप्रथा बंद व्हायलाच पाहिजे व प्रशासनाने या दिशेने सकारात्मक पाऊल उचलने गरजेचे आहे. म्हणूनच महाराजा रावणाच्या सन्मानार्थ दि . १४ ऑक्टोंबर २०२१ रोज गुरूवारला शहिद बाबुराव शेडमाके स्मारक, परिसर, चंद्रपूर येथून ठिक १२ वाजता सर्व पुरोगामी विचारांच्या व सत्य स्विकारणाऱ्या संस्था व व्यक्ती यांच्या सहकार्याने प्रबोधनात्मक भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीत बहुसंख्य जनतेने सामील होऊन समाजातील कुप्रथा संपवण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन जागरचे अध्यक्ष अशोक तुमराम व समाजसेवक भुषण फुसे यांनी केले आहे. पत्रपरिषदेस अशोक तुमराम, भुषण फुसे, जितेश कुळमेथे, नरेन गेडाम, चरणदास भगत, वामन गणविर कपूर आत्राम, कमलेश आत्राम, बाबुराव जुमनाके, जमुना तुमराम, रंजना किन्नाके, वैशाली मेश्राम, प्रिती मडावी, दिवाकर मेश्राम, मनोहर मेश्राम व इतर आदिवासी बांधव उपस्थित होते.