BREAKING : पालकमंत्री विजय वडेट्टीवारविरुद्धची भांगडीयाची एफआयआर याचिका न्यायालयाने फेटाळली 

0
659
Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

नागपूर : मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल व्हावा याकरिता माजी आमदार मितेश भांगडीया यांनी दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी फेटाळून लावली.

न्यायमूर्ती सुनील शुक्रे व अविनाश घरोटे यांनी हा निर्णय दिला. पासपोर्ट विभागाला प्रकरणाची चौकशी करू द्या. त्यानंतर एफआयआर दाखल न झाल्यास याचिकाकर्त्याला न्यायालयात येता येईल. चौकशीपूर्वीच एफआयआर दाखल करण्याचा आदेश देता येणार नाही असे न्यायालयाने स्पष्ट केले.

भांगडिया यांनी केलेल्या याचिकेत विजय वडेट्टीवारयांनी आपल्यावर असणाऱ्या गुन्हे;लपवल्याचा आरोप केला होता. भांगडिया यांनी अनेक वेळा मुख्यमंत्र्यांपासून ते पासपोर्ट ऑफिसपर्यंत तक्रार केली होती. त्यावर;कारवाई झाली नाही म्हणून ते शेवटी हायकोर्टात गेले. अधिक माहितीनुसार विजय वडेट्टीवार यांनी पासपोर्टसाठी मनोरा हा कायमचा पत्ता (पर्मनंट ऍड्रेस);दिला होता. तेथील;पोलीस ठाण्यामधून एनओसी घेतली होती. त्यात त्यांच्यावर कुठेही केसेस सुरू नाहीत असे नमूद होते. त्यामुळे;भांगडिया हायकोर्टात गेले. त्यावेळी हायकोर्टाने पासपोर्ट ऑफिसला पाठवण्यासाठी;नोटीस काढली. त्यानंतर पासपोर्ट कार्यालयाने विजय वडेट्टीवार यांचा पासपोर्ट जप्त केला असल्याची चर्चा सुरु होती.