कोरोनामुळे चिमुरच्या श्रीहरी बालाजीची घोडा यात्रा रद्द

0
54

• 394 वर्षाच्या इतिहासाची परपंरा प्रथमच खंडीत

• घोडा रथ मिरवणूकही निघणार नाही

चंद्रपूर : महाराष्ट्राचे तिरुपती बालाजी म्हणून प्रसिद्ध असलेले चिमूर येथील श्रीहरी बालाजी महाराजाची घोडा यात्रा यावेळी प्रथमच कोरोनामुळे चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी ह्यांनी परवानगी नाकारली आहे. 394 वर्षाच्या इतिहासाची परपंरा ह्यावेळी प्रथमच खंडीत होणार आहे. यात्रेसोबतच घोडा रथ यात्रा ही होणार नाही. ही यात्रा 16 फेब्रुवारी पंधरा दिवसाकरिता दरवर्षीप्रमाणे यावर्षीही होणार होती. जिल्हाधिका-यांनी परवानगी नाकारल्याचे पत्र देवस्थान ट्रस्टला प्राप्त झाले आहे.

महाराष्ट्राचे तिरुपती बालाजी म्हणून चिमूरचे श्रीहरी बालाजी महाराज यांची ओळख आहे. ताडोबा अभयारण्यालगत चिमूर येथे श्रीहरी बालाजी महाराज देवस्थान असून अवघ्या महाराष्ट्राचे श्रद्धास्थान आहे. विदर्भातील भाविकासाठी चिमूरची घोडा रथ यात्रा श्रद्धा आणि आकर्षण विषय असतो. यात्रा सलग 15 दिवस असते. यावेळी 16 फेब्रुवारी वसंतपंचमी ला शुभारंभ होणार होता. पंधरादिवसानंतर 29 फेब्रुवारी समारोप होणार होता. घोडा यात्रा म्हणून प्रसिध्द या यात्रेकरिता विदर्भातील लाखों भाविक येवून दर्शन घेतात. मात्र यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देवस्थान ट्रस्टने जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना यात्रा भरविण्याबाबत परवानगी मागितली होती. जिल्हा प्रशासनाने श्रीहरी बालाजी महाराजाच्या यात्रे सोबतच घोडा रथ मिरवणूस कोरोनामुळे परवानगी देता येणार नसल्याचे पत्र देवस्थान ट्रस्ट ला पाठविले आहे. मात्र नेहमी प्रमाणे देवस्थानाचे पुजारी नित्यनियमाने पूजाअर्चा, धार्मिक विधी करतील असे म्हटले आहे. कोरोनामुळे 394 वर्षाच्या घोडा यात्रेची परंपरा खंडीत होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here