शिवसेना जिल्हाप्रमुख मत्ते यांच्या गावात कांग्रेसचा झेंडा

0
402
Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

वरोरा (चंद्रपूर) : राज्यात सर्वत्र ग्रामपंचायत निवडणूक पार पडल्या. यामध्ये मोठ्या प्रमाणात काँग्रेसला घवघवीत यश मिळाले. वरोरा भद्रावती विधानसभेत देखील अनेक ग्रामपंचायत काँग्रेसने आपला झेंडा लावला. यात शिवसेनेचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष नितीन मत्ते यांच्या बोरगाव शिवणफल येथे काँग्रेसचे सरपंच पदी सतराज कुलसंगे तर उपसरपंच पदी अनिल झाडे यांची निवड करण्यात आली. यामध्ये शिवसेना जिल्हाध्यक्षच्या गावात काँग्रेसचा झेंडा लावण्यात आल्याने. जिल्हाध्यक्ष नितीन मत्ते यांना आपल्या गावातच शिवसेनेची सत्ता बसवू शकले नाही.

मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात विकास कामे सुरु आहे. वरोरा भद्रावती मतदार संघात खासदार बाळू धानोरकर आणि आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या मार्गदर्शनात ग्रामपंचायत निवडणूक घेण्यात आल्या. या क्षेत्राच्या सर्वांगीण विकास हेच लक्ष डोळ्यासमोर ठेऊन धानोरकर दाम्पत्य नेहमी कार्य करीत आहेत. सर्व सामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यात ते नेहमी समोर येऊन मदत करीत असतात. यावरच या ग्रामीण क्षेत्रातील जनतेने देखील विश्वास दाखविला आहे.

वरोरा भद्रावती मतदार संघातील बोरगाव शिवनफल ता.वरोरा येथे काँग्रेसचा झेंडा सरपंच श्री.संतराज नीलकंठ कुलसंगे, उपसरपंच अनिल वामन झाडे, सदस्य संगीता शालीक चौधरी, सौ. लक्ष्मी राहुल किनाके आणि पिजदूरा-मोवाडा गटग्रामपंचयात ता.वरोरा येथे सरपंच सुनिता रघुनाथ आत्राम, उपसरपंच श्री. अरुण झिंगुजी बरडे, सदस्य श्री.ईश्वर पावडे, सौ.जान्हवी लक्ष्मण सिंग बैस, सौ.मायाताई सुरेश झाडे व टेमुर्डा ता.वरोरा येथे काँग्रेस चा झेंडा सरपंच सौ.सुचिता ठाकरे, उपसरपंच श्रीमती विमल वाठोडे, सदस्य श्री.संजय घरत, सदस्य सौ.बेबीताई सुरेश टेकाम, सदस्य सौ.भारती संजय चंदनबटवे यांची हे विजयी झाले आहे.

या विजयामुळे वरोरा भद्रावती मतदार संघातील काँग्रेस कार्यकत्यामध्ये आनंदाचे वातावरण दिसून आले आहे. आज आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी संपूर्ण विजयी उमेदवारांना शुभेच्या देऊन पुढे समाजातील शेवटच्या वर्गाचे प्रश्न सोडविण्याचे आवाहन आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी दिले आहे.