घुग्घुस : देशात कोरोना कोविड – 19 या संसर्गजन्य विषाणूची दुसरी लाट आली असून ही लाट अत्यंत भयावह आहे. हा नवीन स्ट्रेन लहान मुलं तरुण मुलं यांच्यावर ही जीवघेणा हल्ला करीत आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात रुग्ण संख्येचा दिवसां – दिवस स्फोट होत असून आरोग्य व्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे. शासकीय, खाजगी सर्वच रुग्णालय तुंबलेल्या अवस्थेत असून रुग्णांना बेडच उपलब्ध होत नसल्याने प्राणवायूच्या कमतरतेमुळे मोठ्या संख्येने नागरिकांचा जीव जात आहे. मात्र अजून देखील नागरिकांन मध्ये जनजागृतीचा अभाव दिसून येत आहे. भाजीपाला अथवा किराणा घेण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाल्याचे चित्र घुग्घुस परिसरात पाहायला मिळत आहे.
रविवारी घुग्घुस येथे 25, तर आज मंगळवार रोजी घुग्घुस परिसरात 39 संक्रमित रुग्ण आठळून आले आहे आणि हे रुग्ण घुग्घुस नगरपरिषदेच्या सहा ही वॉर्डातील असून शहरात सामूहिक संसर्गाला सुरुवात होणार असल्याचे भीतीदायक चित्र निर्माण झालेले आहे.
येत्या दोन दिवसात राज्य शासनाच्या वतीने कोरोना संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी दोन आठवड्याचा कडक लॉकडाउन लावण्यात येत असून नागरिकांनी आपली व आपल्या कुटुंबाची जवाबदारी स्वतः ची जवाबदारी घ्यावी असे आवाहन वैदकीय अधिकारी वाकदकर यांनी केले आहे.