डॉ. शलाका व डॉ. तन्मय बिडवई यांचे वाढदिवसाच्या निमित्ताने डॉक्टरांना पीपीई किट व फेसशिल्ड मास्कचे वितरण

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

चंद्रपूर : नेहमीच समाज कार्यात अग्रेसर असणारे व माणूसकीचे भान ठेवून काम करणारे भा.ज.प.चे युवा नेते शुभम डोंगे पाटील, यांनी डॉ. शलाका व डॉ. तन्मयजी बिडवई यांचे वाढदिवसाच्या निमित्ताने यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील ग्रामीण भागातील डॉक्टरांना केले पिपीयी किट व फेसशिल्ड मास्कचे वितरण.

कोरोना या महाभयंकर महामारितून वाचवण्यासाठी लोकांना अहोरात्र सेवा देवून त्यांना जीवदान देणारे डॉक्टरांना पीपीयी किट व फेसशिल्ड माक्स देवून त्यांचा, सन्मान केला आणि आपल्या मानवतावादी ह्रदयाचे उदात्त दर्शन शुभम डोंगे पाटील यांनी लोकांना घडवून दिले. त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.