माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांची श्री मंगल कार्यालय कोविड सेंटरला भेट

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

भद्रावती शिक्षण संस्था व शिंदे परीवार यांच्या कोरोना काळातील कार्याची दखल

चंद्रपूर : कोविड-१९ च्या आपात्कालीन स्थितीत भद्रावती शिक्षण संस्था व शिंदे परीवार यांच्या कार्याची दखल घेत आज (दि.13 मे) ला स्थानिक श्री मंगल कार्यालय येथील कोविड सेंटर व शिंदे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलला माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांनी भेट दिली व कोविड सेंटर तथा हॉस्पिटलची पाहणी केली.
यावेळी डॉ. विवेक शिंदे व रविंद्र शिंदे यांचे सोबत हंसराज अहीर यांनी चर्चा केली. भद्रावती शिक्षण संस्था व शिंदे परीवार तर्फे ग्रामीण भागातील जनतेकरीता तालुक्यातील ग्रामपंचायतींना मास्क, सॅनिटायजरचे वितरण करण्यात येत असल्याची माहिती जाणून घेतली.

शिंदे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मधे निशुल्क ओपीडी, हेल्पलाईन नंबर, श्री मंगल कार्यालयातील चारशे खाटांचे निशुल्क कोविड केअर युनिट, जिल्ह्यातील रुग्णांकरीता बेड, ऑक्सीजन व प्लाज्मा डोनरची व्यवस्था करुन देणे, हे सर्व जाणून या कार्याचे कौतुक अहीर यांनी केले. शिंदे परीवाराचे जिल्ह्यातील हे पहिले निशुल्क कोविड सेंटर असुन भविष्यात या कार्याचा आदर्श समाजापुढे राहील असे अहीर म्हणाले.
यावेळी अहीर यांनी वैद्यकीय अधिकारी, शासकीय कर्मचारी यांच्या परीश्रमाचे कौतूक केले.
यावेळी माजी नगराध्यक्ष सुनिल नामोजवार, माजी जि.प. सदस्य विजय वानखेडे, संजय वासेकर, गोपाल बिंजवे, व भाजपा पदाधिकारी तथा कार्यकर्ते उपस्थित होते.