शेकडो युवकांचा काँग्रेस मध्ये प्रवेश

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

घुग्घुस : अच्छे दिनाचे गाजर दाखवून तसेच ” न ” खाऊगा “ना” खाणे दुगाची घोषणा करून “सत्तेत आलेल्या मोदी सरकारने गोर – गरिबांचे दोन वेळच्या जेवणाची ही स्तिथी ठेवली नाही. पेट्रोल, डिझेल, स्वयंपाक गॅस, गोडतेलाच्या महागाईने सर्व सामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे.

बेरोजगारीने तर आजपर्यंतचे सर्वच रेकॉर्ड मोडलेले आहे यामुळे युवकांत मोठ्या प्रमाणात आक्रोश खदखदत आहे याकरिता युवकांचा कल हा काँग्रेस पक्षाकडे

वळला असून काँग्रेस पक्षाचे नेते राहुल जी गांधी, प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, जिल्ह्याचे पालकमंत्री विजय भाऊ वड्डेटीवार, खासदार बाळु भाऊ धानोरकर, यांच्या विचाराशी प्रेरित होऊन जिल्ह्यातील ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश भाऊ देवतळे यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक 13 ऑगस्ट रोजी घुग्घुस काँग्रेस कमेटी अध्यक्ष राजुरेड्डी यांच्या गेल्या पांच वर्षात राजकारणात राहून केलेल्या समाजकारणाने प्रेरित होऊन राजूरेड्डी, जिल्हा किसान सेल जिल्हाध्यक्ष रोशन पचारे, अनुसूचित जाती विभाग जिल्हाध्यक्ष पवन आगदारी, कामगार नेते सैय्यद अनवर यांच्या नेतृत्वाखाली अमराई वॉर्ड क्रं. एक मधील शेकडो युवकांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
यामध्ये शुभम घोडके, सोनू लिंगलवार,अंकुश सुरोसे,वसंता कामतवार, निलेश पेंदोर, सौरभ घोडके, अभिजित वाढई, रियाज शेख, संदीप कामतवार, सतीश कोडापे, स्वप्निल गेडाम,आशिष कामतवार, राज कींनाके, विलास इंगोले, आकाश टेकाम,फिरोज पठाण, धीरज टेकाम, मारोती मोहूर्ले, ईश्वर कोडापे, अमन सिद्दिकी, आफताब अहमद, मुर्तुजा शाह, अफजल सिद्दिकी, प्रदीप मडावी यासह अन्य युवकांनी प्रवेश केला.

युवकांच्या काँग्रेस पक्षा प्रवेशा करिता नुरुल सिद्दीकी, इर्शाद कुरेशी, रोशन दंतलवार, यांनी अथक प्रयत्न केले.
याप्रसंगी अंकुश सपाटे, सचिन कोंडावार, जुबेर शेख, सुनील पाटील, विजय रेड्डी, हे उपस्थित होते.