अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट ठार

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

• वरोरा – भद्रावती मार्गावरील घटना
• पाच बिबट समूहाने असल्याची माहिती

चंद्रपूर : रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाची धडक लागून एका बिबट्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना वरोरा भद्रावती मार्गावरील टाकळी गावाजवळ घडली आज शुक्रवारी (13 आॅगस्ट) रात्री साडे आठ वाजताच्या सुमारास घडली. याबाबत भद्रावती वन विभागाला माहिती देण्यात आली असून वृत्त लिहीपर्यंत सदर बिबट घटनास्थळीच पडून होता.

काही प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, आज शुक्रवारी रात्री रात्री साडेआठच्या सुमारास वरोरा भद्रावती मार्गावरील टाकळी गावाजवळ पाच बिबट समूहाने आढळून आलेत. यापैकी एका मोठ्या बिबटने रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न केला असता त्याच मार्गाने भरधाव आलेल्या एका अज्ञात वाहनाने त्याला जबर धडक दिल. यात सदर बिकट घटनास्थळीच ठार झाल. त्यानंतर अज्ञात वाहन घटनास्थळावरून प्रसार झाला आहे. उरलेले चार बिबट इतरत्र पळून गेल्याचे काही प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. मृत्यू झालेला बिकट रस्त्यावर पडून असल्याचे काही प्रवाशांना आढळून आल्याने काहींनी भद्रावती वनपरिक्षेत्राधिकारी शेंडे यांना माहिती दिली. मात्र वृत्त लिहीपर्यंत घटनास्थळी वनविभागाचे अधिकारी उपस्थित झालेले नव्हते. वरोरा भद्रावती महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. जंगल भागातून वन्य प्राणी रस्ता ओलांडत असतात. भरधाव वाहनामुळे वन्यप्राण्यांना अपघातात जीव गमवावा लागतो त्यामुळे जंगल लगत असलेल्या मार्गावर वन्य प्राण्यांचे जीव वाचविण्यासाठी वन विभागाने प्रयत्न करावेत अशी मागणी वन्यजीवप्रेमवंनी केली आहे.