‘लव्ह यु जिंदगी’ म्हणणाऱ्या ‘त्या’ तरुणीचा अखेर मृत्यू

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात कहर केला आहे. रोज ३ लाखांपेक्षा जास्त बाधितांची नोंद होताना पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या या लाटेत सर्वाधिक तरूणांना लागण झाल्याचे समोर आले. दरम्यान, काही दिवसापूर्वी सोशल मीडियावर ‘लव्ह यु जिंदगी’ असं म्हणणारी एक तरुणी कोरोनाशी लढत असल्याचे दिसत होते. मात्र तिची ही लढाई अखेर अपयशी झाली आहे. तिचा अखेर कोरोनामुळे मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.

दिल्लीतील एका रुग्णालयात भरती असलेल्या ३० वर्षीय कोरोना रुग्ण तरूणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हॉस्पिटलमधील इमरजेंसी फिजिशियन डॉक्टर मोनिका लेंगे यांनी स्वतः या तरूणीचा व्हिडीओ शेअर करून कौतुकही केले होते. सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला होता. त्यात त्यांनी तरुणीच्या धाडसाचे कौतुक केले होते. आता त्याच डॉक्टरांनी व्हिडीओ शेअर करत तिच्या निधनाची बातमी दिली आहे.

दुर्दैवाने, ती हिची लढाई जिंकू शकली नाही. “ आपण एक शूर असा आत्मा गमावला आहे… ओम शांती. स्वतःच्या मुलीला कुटुंबीयांनी गमावले आहे हे सहन करण्याची ताकत देव त्यांना देवो ही प्रार्थना, असे डॉ. लेंगे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, काही दिवसापूर्वी डॉ. मोनिका लेंगे यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला होता. व्हिडिओमध्ये, मुलीच्या तोंडावर ऑक्सिजनचा मास्क आहे आणि ‘लव्ह यू झिंदगी …’ हे गाणे चालू आहे. डॉक्टर मोनिकाने कॅप्शनमध्ये लिहिले होते कि, ‘ही मुलगी केवळ 30 वर्षांची आहे आणि तिला आयसीयू बेड मिळालेला नाही.