चंद्रपूर : मुस्लिम समाजातील पवित्र सण मानल्या जाणाऱ्या रमजान ईदचे औचित्य साधत सामाजिक संवेदनशीलतेतून बिबी येथील हबीब शेख यांनी कोरोना विलागिकरण केंद्रातील रुग्णांना अंडी व सुकामेवा वाटप केले. कोव्हीड केअर सेंटर होली फँमीली गडचांदुर मधे हा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी कोव्हीड सेटरच्या भोजनाची व्यवस्था सांभाळणाऱ्या आचाऱ्यांकडे ही सुकामेवा व अंडी सुपुर्द करण्यात आली. यावेळी अँड दिपक चटप,संतोष उपरे, भारत आत्राम उपस्थित होते.
सामाजिक कार्यकर्ते हबीब शेख यांनी मनोगत व्यक्त करताना दरवर्षी ईद निमित्ताने केला जाणा-या खर्चाची बचत करून कोव्हीड केअर सेंटरला सुकामेवा व अंडी सामाजिक दायित्व म्हणून वाटप केले. कोरोना महामारीने आरोग्याचे व सदृढ आहाराचे महत्त्व अधोरेखित केले आहे. सहकार्याच्या भावनेतून एकमेकांना मदत करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.