तत्काळ चार्ज शीट दाखल करून फास्ट ट्रॅक कोर्ट केस मध्ये चालवावी

◆ पिडितेच्या तक्रारीवर कारवाई न करणार्‍या पोलीस अधिका-यांनाः निलंबित करा
◆ आम आदमी पार्टीची मागणी

चंद्रपूर : 17 वर्षीय कु.वैष्णवी आंबटकर या युवतीवर दिनांक 9-9-2021ला सायंकाळी 6:30 वाजता एका नराधमाकडून एकतर्फी प्रेम प्रकरणातून (चाकूने )भ्याड हल्ला झाला. त्या हल्ल्यात ती गंभीरपणे जखमी झाली. तिच्यावर नागपूर येथे उपचार सुरू होते. मृत्यूशी झुंज देत असतांनाच काल रात्री 9 वाजता तिची प्राणज्योत मालवली.

आज दुपारला तिचे पार्थिव शरीर बाबुपेठ नेताजी चौक येथे पोहचताच बाबुपेठ मधील असंख्य नागरिकांनी जो पर्यंत पिढीत परिवाराला न्याय मिळणार नाही तो पर्यंत पार्थिव शरीर न हलविण्याचे निर्णय केला, एकीकडे पीडितेने काही दिवस अगोदरच आरोपीविरोधात रामनगर पोलिस स्टेशनला तक्रार केली होती पण पोलिस प्रशासनाने त्या पीडितेच्या तक्रारीवर तक्रारीला केराची टोपली दाखवत कुठलीही कारवाई केली नाही त्यामुळे आरोपीला व हे कृत्य करण्यास वाव मिळाल्याचा आरोप करण्यात आला आणि दुसरीकडे पोलीस प्रशासनाने दबाव तंत्र टाकत काही आंदोलन करते यांना आंदोलन बंद करण्यास भाग पाडले परंतु
आम आदमी पार्टी चे शहर सचिव राजु शंकरराव कुडे यांनी जो पर्यंत पोलीस अधीक्षक, किंवा प्रशासनाचे जबाबदार अधिकारी येथे येऊन आमच्या मागण्या पूर्ण करणार नाही तो पर्यंत आम्ही येथून हटणार नाही अशी स्पष्ट भूमिका सिटी पोलीस स्टेशन चे निरीक्षक अंबोरे यांच्या समोर मांडली आणि रुग्णवाहिके समोर लोटांगण गेले तेव्हा याची दखल पोलीस प्रशासनाने घेतली आणि पोलीस उपाधीक्षक कुलकर्णी साहेब यांना याची माहिती दिली तसेच घटनेची माहिती मिळताच चंद्रपूर विधान सभेचे आ. किशोर भाऊ जोरगेवार तेथे पोहचले त्यांनी मृत तसेच पिढीत परिवाराला 35 हजार रुपये आणि परिवारातील एका सदस्य ला कंत्राटी कामगार म्हणून नियुक्त करणार असे आश्वासन दिले.तेवढ्यात पोलीस उपअधीक्षक कुळकर्णी सर पोचले त्यांच्या पुढे सामाजिक कार्यकर्ते तसेच जनतेनी ३ मागणी केली, ही केसची चार्ज शीट 8 दिवसात दाखल करून फास्ट ट्रॅक कोर्ट मध्ये चालवावी, पीडितेने केलेल्या तक्रारीवर कारवाई न करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात यावे,पिडीत परिवाराला प्रशासनाकडून आर्थिक मदत मिळावी बाबुपेठ ची पोलीस चौकी तात्काळ सुरू करावी.

या मागण्या रास्त असल्याने त्यांनी या मागण्या मान्य केल्या असून जिल्हाधिकारी यांच्यासोबत उद्या 11 वाजता तात्काळ या संबंधित बैठकीचे आयोजन करण्यास भाग पाडले आहे व जो पर्यत पीडीत परीवाराला न्याय मीळत नाही तो पर्यत आम आदमी पार्टी स्वस्थ बसणार नाही. या वेळी सामाजिक कार्यकर्त्या चंदा ताई वैरागडे, कार्तिक बल्लावार, महेश वासलवार, महेश मेकलवार, बाबुपेठ प्रभागातील आम आदमी पक्षाचे सुशांत धकाते, सय्यद अश्रफ अली, चंदू माडुरवार, कालिदास ओरके, निखिल बरसागडे, सोबत आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील मुसळे, युवा जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार, जिल्हा कोषाध्यक्ष भिवराज सोनी, सोशल मीडिया हेड राजेश चेटगुलवर,शहर उपाध्यक्ष सिकंदर सागोरे व अनेक सामाजिक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.