अंमलनाला धरणाच्या वेस्ट वेअर मध्ये दोघांना जलसमाधी

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

 पर्यटनावर बंदी घालण्याची मागणी

चंद्रपूर : धरणाच्या निघालेल्यावेस्ट वेअरवर पर्यटनाच्या उद्देशाने गेलेल्या दोन तरुणांना जलसमाधी मिळाल्याची घटना आज मंगळवारी (14 सप्टेंबर) ला दुपारदुपारी तीन वाजताचे सुमारास कोरपना तालुक्याती अंमलनाला धरणाच्या सांडव्यावर घडली आहे. नदीम फिरोज अली(21)बल्लारपूर, व तोफिक निसार शेख (22)विहिरगाव अशी मृतांची नावे आहेत.

कोरोना तालुक्यातील अंमलनाला धरण सततच्या पावसामुळे तुडूंब भरून धरण ओव्हर फ्लो झाला आहे. सांडव्यावरून भरभरून पाणी बाहेर पडत आहे. आज मंगळवारी दुपारच्या सुमारास चार ते पाच तरूण पर्यटनाच्या उदेश्याने वेस्ट वेअर वर गेले होते. दरम्यान वेस्टवेअर मध्ये पर्यटन करताना त्यापैकी दोन युवकांचा बुडून मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले, मृतकांची नावे नदीम फिरोज अली(21) बल्लारपूर,
तोफिक निसार शेख (22) विहिरगाव अशी आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बुडालेल्या युवकांना बाहेर काढले व पंचनामा करून शवविच्छेदन साठी ग्रामीण रुग्णालयात पाठविले. सदर ठिकाणी बऱ्याच वेळा दुर्घटना घडली आहे. मागील महिन्यात चंद्रपूर येथील एका युवकाचा बुडून मृत्यू झाला होता, आज पुन्हा एकदा त्याच ठिकाणी 2 युवकांना जलसमाधी मिळाली आहे. पोलीस प्रशासन ने सदर क्षेत्र मध्ये पर्यटक ला जाण्यासाठी बंदी घालावी अशी मागणी केली जात आहे.