चंद्रपुर शहरात ‘हेरिटेज ट्री’ दर्जा असलेल्या चिंचेचे झाडाची अवैद्य कत्तल

हेरिटेज ट्री वृक्षांचे संरक्षण करा : बंडू धोतरे, अध्यक्ष, इको-प्रो
चंद्रपूर : शहरातील जटपुरा वार्ड मधील सेंट माइकल स्कूल समोरच्या परिसरातील 100+ वर्ष वयाच्या दोन चिंच्याच्या वृक्षाची विनापरवानगी कत्तल करण्यात आली. एका वृक्षाची बुड़ापासुन तर दुसऱ्या वृक्षाची वरच्या संपूर्ण फांदया कापुन बोडखे करण्यात आले. अशी वृक्ष ‘हेरिटेज ट्री’ म्हणून त्यांना अधिक संरक्षण देण्याच्या गरज असताना हे वृक्षांची अवैद्य कत्तल केल्याने यावर महानगरपालिका कडून त्वरित कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी, अशी शहरातील नागरिकांची मागणी जोर धरत आहे.
शहरातील असलेल्या 100 वर्ष वयाची वृक्षाची नोंद ‘वृक्ष गणना’ दरम्यान करण्यात आलेली असून अशा वृक्षाना नुकतेच पर्यावरण विभागाने “हेरिटेज ट्री” चा दर्ज दिलेला आहे. त्याचे संरक्षण करण्याचे निर्देश आहेत. बाबत स्थानिक पातळीवर हेरिटेज वृक्षाजवळ महानगरपालिका कडून फलक लावण्यात यावे, त्याबाबत परिसरात जागृती करण्यात यावी.
: बंडू धोतरे, अध्यक्ष, इको-प्रो