घुग्घुस येथे आत्महत्येचे सत्र; एक आठवड्यात तीन युवक व महिलेची आत्महत्या

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

चंद्रपूर : औद्योगिक शहर असलेल्या घुग्घुस येथे एकाच आठवड्यात झालेल्या आत्महत्येने खळबळ माजली आहे. काल रात्री अनिकेत नलभोगा वय 22 वर्ष विद्या टॉकीज मागील परिसरात राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली. त्याला आठ महिन्याची मुलगी आहे.

आज सकाळी शालीकराम नगर येथील 28 वर्षीय संतोष वर्मा यांनी गळफास घेवून आत्महत्या केली. चार दिवसांपूर्वी सुभाष नगर येथील 22 वर्षीय विद्यार्थी प्रवीण वाघमारे यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

वॉर्ड क्रं सहा येथील रविता मंगल जूनघरी या विवाहित महलीने वर्धा नदीत उडी घेऊन आत्महत्या केली.
अमराई येथील पती – पत्नी मधील पतीचे आत्महत्या प्रकरण ही खळबळजनक होते तर लेडीज पार्लर व्यवसायकाची आत्महत्या ही मनाला चटका लावून जाणारी होती. युवकांच्या वाढत्या आत्महत्या प्रकरणाने पालकांच्या चिंता वाढल्या आहेत.