बल्लारपूर : पक्षाचा विस्तार करण्यासोबतच कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जनतेच्या समस्यांचे निराकरण व्हावे, पक्ष संघटन अधिक मजबूत व्हावी, याकरिता बल्लारपूर शहर काँग्रेस कमिटी’चे अध्यक्ष अब्दुल करीम शेख यांच्यासह पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून वर्ष २०२१ या चालू वर्षासाठी काँग्रेसची नवीन कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली आहेत.
आगामी पालिकेची निवडणूक पाहता पक्षांतर्गत मतभेद दूर करून पक्षात एकसूत्री कारभार आणि पक्ष संघटना मजबूत करण्याच्या दृष्टीने शहरात वर्ष २०२१ या चालू वर्षांसाठी नवीन कार्यकारणी पक्षाच्या नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात जाहीर करीत नियुक्तीपत्र देण्यात आले. या कार्यकारणी मध्ये पक्षातील वरिष्ठ नेत्यांना मार्गदर्शक म्हणून स्थान देण्यात आले असून, आता पक्षात उपाध्यक्ष-६, महासचिव-६, सचिव-७, सहसचिव-७, कोषाध्यक्ष-१, प्रसिद्धी प्रमुख-१,महिला प्रतिनिधी आणि युवकांचा समावेश करून सर्व समावेशक अशी कार्यकारणी तयार करण्यात आली आहेत.
” हि सर्व समावेशक कार्यकारणी असून, यामध्ये तरुणांसह महिलांनाही विशेष स्थान देण्यात आले आहेत. आगामी काळात हि कार्यकारणी पक्षाला नक्कीच बळ देणारी ठरणार असल्याचे मत, शहराध्यक्ष अब्दुल करीम शेख यांनी व्यक्त केले आहेत.”
यावेळी डॉ. रजनीताई हजारे, घनश्याम मुलचंदानी, डॉ.मधुकर बावणे, डॉ. सुनील कुल्दीवार, सौ.छाया मडावी, भास्कर माकोडे, देवेंद्र आर्य, अनिल खरतड, डेव्हिड कामप्पेली, सुरेश गलानी, हेमंत मानकर, महेबूब पठाण, जयकरसिंग बजगोती, नरेश मुंदडा, इस्माईल ढाकवाला यांच्यासह पक्षातील वरिष्ठ नेते आणि कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.




















