वडिलांच्या उपचारासाठी २४ तास महाराष्ट्र आणि तेलंगणातील हॉस्पिटलच्या फेऱ्या मारल्या

• कोरोना रूग्ण वाढल्याने रूग्णालयात बेड मिळेना
• आरोग्य सेवेचा बोजवारा
• वडिलांना रुग्णवाहिकेत तडफताना पाहून मन कासावीस झाला

चंद्रपूर : कोरोना विषाणूचा संसर्गाने हाहाकार माजला आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकार विविध उपाययोजना करीत आहेत. नाईट कर्फ्यू आणि आता पंधरा दिवसांकरीता संचारबंदी करून लाॅकडाऊन लावण्यात आलेला आहे. परिस्थिती दिवसागणिक बिघडत आहे. उपचाराअभावी रूग्णांची फरफट होत आहे. दोन दिवसांपूर्वी एका रूग्णाला बारा तास बेडकरीता फुटपाथवर पडून राहावे लागल्याची घटना ताजी असतानाच वरोरा येथील एका रुग्णांला महाराष्ट्र आणि तेलंगानाच्या 24 तास फे-या मारूणही सुविधा उपलब्ध होवू शकली नाही. या घटनेवरूण कोरोना बाबतची परिस्थितीगंभीर होत चालली आहे.
दुपारी ३ वाजल्यापासून सागर त्याच्या वडिलांना घेऊन हॉस्पिटलच्या चक्करा मारत आहे. पहिल्यांदा चंद्रपूरातील वरोरा येथील हॉस्पिटलला घेऊन गेला पण तिथे बेड मिळाला नाही. त्यानंतर अनेक खासगी रुग्णालयात नेलं. तिथेही जागा शिल्लक नव्हती. रात्री दीडच्या सुमारास तो वडिलांना घेऊन तेलंगाणाला गेला. पण तेथेही उपचार होऊ शकले नाहीत. सकाळी पुन्हा तो महाराष्ट्रात पोहचला. त्यानंतर रात्री ला वडिलांना बेड आणि आॅक्सीजनची सेवा उपलब्ध झाली.

24 तास आपल्या वडिलांना रुग्णवाहिकेत तडफताना पाहून सागर खूप निराश झाला. एम्ब्युलन्समधील ऑक्सिजनही संपले. त्यामुळे हताश झालेला सागर प्रशासनाकडे विनवणी करू लागला आहे की, माझ्या वडिलांना उपचारासाठी बेड द्या नाहीतर त्यांना इंजेक्शन देऊन मारून टाका. मी त्यांना अशा अवस्थेत घरी घेऊन जाऊ शकत नाही असं सागर म्हणत राहिला. कोरोनामुळे आरोग्य यंत्रणेचा बोजवारा उडालेला असताना चंद्रपूरातील या प्रकारानं सामान्य नागरिक किती हतबल झालाय ते दिसून येत आहे.