चंद्रपुर जिल्ह्यासाठी रेमिडीसीवीर इंजेक्शन्सचा तातडीने पुरवठा करा : आ. सुधीर मुनगंटीवार यांची मागणी

0
9
Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

• जिल्‍हयात रेमिडीसीवीर इंजेक्‍श्‍नचा प्रचंड तुटवडा
• डॉ राजेंद्र शिंगणे यांचे इंजेक्शन्स उपलब्ध करण्याचे आश्वासन

चंद्रपुर : जिल्ह्यासाठी तातडीने रेमिडीसीवीर इंजेक्शन्स तातडीने उपलब्ध करावे अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा विधिमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांना दिला आहे. या विषया संदर्भात आ. मुनगंटीवार यांनी डॉ . राजेंद्र शिंगणे यांच्याशी चर्चा केली . त्यांनी सुद्धा तातडीने चंद्रपुर जिल्ह्यासाठी इंजेक्शन्स उपलब्ध करण्याचे आश्वासन आ. मुनगंटीवार यांना दिले आहे.

चंद्रपूर जिल्‍हयात रेमिडीसीवीर इंजेक्‍श्‍नचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. त्‍यामुळे कोरोना रूग्‍णांचे हाल होत आहेत. मृत्‍युदर वाढत आहे मात्र चंद्रपूर जिल्‍हयासाठी इंजेक्‍शन उपलब्‍ध होत नाहीत ही चिंतेची बाब आहे . आपण नाशिकला ७ हजार इंजेक्‍शन उपलब्‍ध केले, मुंबई व नागपूर साठी सुध्‍दा इंजेक्‍शन उपलब्‍ध केले, मात्र चंद्रपूर जिल्‍हयासंदर्भातच असा सापत्‍न भाव का असा प्रश्‍न मनात निर्माण झाला आहे. नागपूरच्‍या डेपोमध्‍ये आज इंजेक्‍शन उपलब्‍ध झाल्‍याचे समजते. आपण त्‍वरीत इंजेक्‍शन उ्दया सकाळपर्यंत चंद्रपूर जिल्‍हयासाठी उपलब्‍ध करावे, अशी मागणी आ. मुनगंटीवार यांनी केली.