मदतीचा एक घास’ मधून मदती सोबत रुगांच्या नातेवाईकाचा आशीर्वाद देखील मिळणार : ना. विजय वडेट्टीवार

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

• मदतीचा एक घास या उपक्रमाची चंद्रपूरात झाली सुरवात

चंद्रपूर : कोरोना च्या दुसऱ्या लाटेमध्ये अनेक लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. राज्यातील लॉक डाऊन मुळे सर्व हॉटेल्स व उपहारगृह देखील बंद आहे. कोरोना ग्रस्त लोकांचे नातेवाईक शासकीय रुग्णालयाच्या आवारात वाट बघत असतात.

गाव खेड्यातुन आलेल्या अशा नातेवाईकांना घरचे जेवण मिळावे या उद्देशाने, महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस च्या वतीने ‘मदतीचा एक घास’ हा उपक्रम संपूर्ण राज्यात राबवला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून चंद्रपूर महिला काँग्रेस च्या वतीने या अभिनव उपक्रमाची सुरवात महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस च्या सचिव नम्रता आचार्य ठेमस्कर यांच्या पुढाकाराने चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात करण्यात आली.

या उपक्रमाचे उद्घाटन राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तसेच पालकमंत्री चंद्रपूर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महिला काँग्रेस च्या महिलांनी स्वतः आपल्या घरून जेवणाचे डब्बे आणले होते, महिला या संवेदनशील असतात त्यांच्या स्वयंपकात प्रेम आणि आपुलकीची भावना असते, म्हणून च मदतीचा एक घास गरजू लोकांना मिळावा हा या उपक्रमाचा उद्देश असून आज महिला काँग्रेस च्या वतीने २५० डब्बे गरजू लोकांना वितरित करण्यात आले.

या वेळी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी महिलांना या अभिनव उपक्रमा साठी शुभेच्छा दिल्या. त्याच सोबत महिला काँग्रेस च्या माध्यमातून मदतीचा एक घास जो रुगांना मिळत आहे, त्यातून गरजू लोकांचे आशीर्वाद प्राप्त होणार आहेत. महिला काँग्रेस नी कोरोनाच्या संकट काळात देखील हा उपक्रम राबवून गरजूंची मदत घेण्याची भूमिका घेतली ती कौतुकास्पद आहे, या उपक्रमात अनेक समाजसेवी लोकांनी सुद्धा सहभाग घ्यावा असे आवाहन पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी या वेळी केले.

हा उपक्रम किमान दोन आठवडे सुरू च राहणार अशी माहिती प्रदेश सचिव नम्रता आचार्य ठेमस्कर यांनी दिली आहे.या उपक्रमात माजी महापौर संगीता अमृतकर, जिल्हा उपाध्यक्ष सुनीता धोटे, जिल्हा उपाध्यक्ष व माजी सभापती हर्षा चांदेकर, नगरसेविका ललिता रेवलीकर, ब्लॉक अध्यक्ष शीतल काटकर, उपाध्यक्ष उषा धांडे,बल्लरपूर तालुका अध्यक्षा अफसाना साययद, बल्लरपूर शहर अध्यक्ष मेघा भाले, शहर सचिव वाणी डारला, स्वाती त्रिवेदी, सुनंदा धोबे, कल्पना गिरडकर,शांती घुगलक,लता बारापत्रे या महिला काँग्रेस च्या पदाधिकारी उपस्थित होत्या.