ठग उत्खनन अधिका-यास अटक

चंद्रपूर : मागील वर्षी प्रिया परमेश्वर झामरे (40) रा. बल्लारशाह यांनी आपल्या वाहनात तिघांना घेऊन वढा येथे रेती घाटावर जाऊन आम्ही उत्खनन विभागातून आलो आहे असे सांगितले व एक ट्रॅक्टर पकडले होते. हजारो रुपये वसुल करून पळ काढला होता. याची चर्चा घुग्घुस परिसरात रंगली होती.

हि माहिती मिळताच भौगोलिक माहिती विभागाच्या अल्का खेडकर यांनी घुग्घुस पोलीस स्टेशन तक्रार दिली होती. तक्रारी वरून पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हा दाखल होताच मुख्य सूत्रधार प्रिया झामरे ही फरार झाली होती. तिने उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता परंतु तो अर्ज फेटाळण्यात आला अर्ज फेटाळताच गुरवारला घुग्गुस पोलीस स्टेशनच्या सहा.पोनि. मेघा गोखरे यांनी आपल्या पथकासह बल्लारशाह गाठून आरोपी प्रिया झामरे यांना अटक केली. शुक्रवारला चंद्रपूर न्यायालयात हजार केले असता त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.