पत्रकार गणपत खोबरे यांचं कोरोनाने निधन

चंद्रपूर : पुण्य नगरी चिमूर चे तालुका प्रतिनिधी तथा चिमूर तालुका पत्रकार संघाचे सचिव गणपतजी खोबरे यांचे कोरोना मुळे आज पहाटे दुःखद निधन झाले. एक प्रामाणिक निर्भीड समाजसेवक, सच्चा पत्रकार आणि चिमूर तालुका पत्रकार संघाचा आधारवड असलेले गणपतजी खोबरे यांना कोरोनाची लागण झाली होती.

मागील अनेक वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात खोबरे कार्यरत होते, त्यांनी नुकताच डिजिटल मीडियात प्रवेश घेत, जनसामान्य नागरिकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला मात्र निर्भीड व्यक्तिमत्त्व असलेला हुरहुन्नरी पत्रकार कोरोनापुढे हरला, त्यांच्या निधनाने पत्रकारिता क्षेत्राची हानी झाली आहे.

अनेक पत्रकारांचा सच्चा मित्र म्हणून त्यांची ओळख होती, चिमूर सहित चंद्रपूर जिल्ह्यातील पत्रकार क्षेत्रात दुःखाचे वातावरण पसरले आहे.