वेकोलि बल्लारपूर क्षेत्रातील गोवरी 1 खाणीत अपघात; 5 कामगार गंभीर जखमी

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

• नियंत्रण सुटल्याने डंपर आर सी इमारतीवर धडकला

चंद्रपूर : वेकोलि बल्लारपूर क्षेत्रातील गोवरी 1 खाणीत मोठा अपघात झाला असुन ह्या अपघातात वेकोलिचे 5 कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी वेकोलिच्या धोपटला येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गंभीर जखमींमध्ये गोवरी 1 खाणीचेे व्यवस्थापक प्रसाद, साखरे, जे पी सरदार, प्रभाकर चन्ने यांचा समावेश आहे. तर एका कामगाराचे नाव कळलेनाही. ही घटना आज शुक्रवारी (16 एप्रिल) ला सकाळी नऊच्या सुमारास घडली.

प्राप्त माहितीनुसार, गोवरी 1 खाणीत आर सी इमारतीच्या शेजारीच डंपरचे पार्किंग केल्या जाते. तिथे उभ्या असलेल्या एका नादुरुस्त डंपरला मेंटेनंन्स विभागातील एक कर्मचारी दुरुस्तीसाठी न्यायच्या प्रयत्नात असताना त्याचे नियंत्रण सुटल्याने डंपरने तिथेच असलेल्या लोखंडी खांबाला जबर धडक दिली आणि डंपर आर सी इमारतीवर धडकला. ही धडक इतकी जोरदार होती की धडकेत आर सी इमारतीची भिंत तोडुन डंपर आत शिरला. अचानक झालेल्या ह्या अपघातात आर सी इमारतीच्या आत कामावर असलेले वेकोलिचे 5 कर्मचारी गंभीर जखमी झाले असुन त्यांना उपचारासाठी वेकोलिच्या धोपटला स्थित दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.