दोन दुचाकीच्या धडकेत, दोन ठार तर एक जखमी

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

चंद्रपूर : ब्रह्मपुरी-आरमोरी महामार्गालगत रनमोचन फाट्याला लागून असलेल्या बसस्थानकाजवळ अचानक दोन दुचाकीचे समोरा समोर धडक दिल्याने झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू तर दुसऱ्याचा रुग्णालयात मृत्यू झाला असून एक गंभीर जखमी आहे त्यापैकी एक गांगलवाडी येथील रहिवासी असून बाकी दोन्ही युवक ब्रह्मपुरी येथील रहिवासी आहेत

प्राप्त माहितीनुसार काल काल दिनांक १५ ऑगस्ट रोजी प्रहार पक्षाच्या क्रॉयक्रमाच्या प्रत्रिका वाटप करण्यासाठी काल सायंकाळ च्या दरम्यान गांगलवाडी – मुडझा क्षेत्राकडे प्रहार संघटनेचे सदस्य श्रीराम (बंडु) उरकुडे जाणी वार्ड ब्रम्हपूरी व सुधिर सावरकर धुम्मनखेडा ब्रम्हपूरी हे दोघेही गेले व आपले काम आटपून MH ३४ – AR ६३८२ या दुचाकी वाहनाने ब्रम्हपूरी कडे येत होते व निणर्य देवगडे गांगलवाडी हे ब्रम्हपूरी ला कामानिमित्त आले होते.ते आपले काम आटपून MH ३४- AY – ९५६१  दुचाकी वाहनाने गांगलवाडी ला जात असताना काल रात्री च्या आठ वाजता दरम्यान आरमोरी रोडवरील रणमोचन फाट्याजवळ दोन्ही दुचाकीची समोरासमोर जबर धडक दिल्याने यामध्ये निर्णय देवगडे वय ३१ यांचा जागीच मृत्यू झाला असून सुधीर (गड्डु) सावरकर वय ३३ यांनी ग्रामिण रुग्णालय ब्रम्हपूरी येथे उपचारा दरम्यान मुत्यु झाला असुन जखमी अवस्थेत असलेले श्रीराम (बंडु) उरकुडे जाणी वार्ड ब्रम्हपूरी यांना खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सदर घटनेत आरोपी विरोधात ५३४,२१,कलम ३०४(अ),२७९,३३८,१८४ भादवी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेत तपासीय अधिकारी उप पोलिस निरीक्षक सुपेंद्र उपरे व पोलिस शिपाई योगेश शिवनकर यांनी केले.