“ॲनामिया ‘ रोगाबाबत किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

संत गजानन महाराज हायस्कूल येथील उपक्रम

नागभीड (चंद्रपूर) : एकविसाव्या शतकातील यंत्रयुगात स्पर्धात्मक जीवनशैलीमुळे मानव जीवन खूप व्यस्ततेत गुंतले आहे. याचा विपरीत परिणाम मनुष्य जीवनावर होत असून यातून विविध आजार पुढे येत आहे. यापैकीच एक असलेल्या “ॲनामिया’ या भविष्यकाळातील भयंकर रोगाबाबत जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन संत गजानन महाराज हायस्कूल चिखलगाव येथे करण्यात आले.

आयोजित आरोग्य पर जनजागृती कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळेचे मुख्याध्यापक बी .डब्ल्यू . खोब्रागडे, तर प्रमुख अतिथी म्हणून बी. एम. गायकवाड, सहाय्यक शिक्षक जी.वी. खोब्रागडे, प्रशांत जांभळे, प्रतिभा दडमल तर मार्गदर्शक म्हणून नलिनी आत्रम, लता मसराम, आशा वर्कर वरखडे प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी वर्ग नववी व दहावीच्या किशोरवयीन विद्यार्थ्यांना “ॲनामिया’ या रोगाबाबत विस्तृत माहिती देऊन भावी जीवनात उद्भवणाऱ्या अपत्या संबंधीच्या कुपोषणाबाबत माहिती देत त्यावर रोगनिदान व उपचार या संदर्भात जीवनात बदल करावयाची शैली याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षिका शुभांगी कामडी, प्रास्ताविक मुख्याध्यापक बी.डब्ल्यू. खोब्रागडे तर आभार प्रतिभा जांभळे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आरोग्य विभाग प्रमुख व शाळेचे कर्मचारी वृंद यांनी अथक परिश्रम घेतले या प्रसंगी वर्ग नऊ वी व दहावीच्या विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होत्या.