नगर परिषद च्या निवडणुका मत पत्रिकेने घ्यावी – पप्पु शेख

0
303

चिमूर (चंद्रपूर) : येत्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होत असून त्यात नगर परिषद, नगर पंचायत च्या निवडणुका होणार आहे परंतु ईव्हीएम मशीन ने मतदान प्रकियेत अनियमितता होत असल्याने विजयी होणारे उमेदवार हे पराभूत होत असतात त्यामुळे शासनाने येणाऱ्या काळातील नगर परिषद व पंचायत च्या निवडणुका मत पत्रिकेने घेण्याची मागणी कांग्रेसचे शफीक उर्फ पप्पु शेख यांनी केली आहे

चिमूर सह राज्यात नगर परिषद व नगर पंचायत च्या निवडणुका होत असून ईव्हीएम मशिनच्या प्रकियेत घोळ निर्माण होत असतो त्यामुळे निवडून येणाऱ्या उमेदवारात संभ्रम निर्माण होतो आणि त्यास पराभवास सामोरे जावे लागते
अश्यावेळी पारदर्शकता ठेवून घोळ होणार नाही यासाठी ईव्हीएम मशीन ने मतदान न करता मत प्रत्रिकेने मतदान करण्याची मागणी कांग्रेस कार्यकर्ता शफीक उर्फ पप्पू शेख यांनी केली आहे