गप्पा गोष्टींचा फळ भरविणारे सहा मित्र झाले कोरोना बाधीत

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

• खर्रा ठरतोय कोरोना संसर्गाचे माध्यम
• वेकोलिच्या सास्ती धोपटाला वसाहती घटना

चंद्रपूर : जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे तर मृत्यूचा आकाही चिंताजनक आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन मास्कचा नियमित वापर करावा, वारंवार हात धुवावे आणि शारीरिक अंतर राखावे या त्रिसूत्रींचा वापर करावा असे आवाहन करीत आहे. मात्र काही ठिकाणी या त्रिसुत्रीं नियमांची पायमल्ली होत आहे. राजुरा तालुक्यातील सास्ती धोपटाळा वसाहतीमध्ये सहा जिवलग मित्र कारखान्याच्या निमित्ताने एकत्र यायचे, गप्पागोष्टींचा फड रंगवायचे मात्र हा गप्पांचा फळ भरविणे त्यां मित्रांच्या अंगलट आले आहे. सहाही मित्र नुकतेच कोरोना बाधित झाले आहे. त्यामुळे खर्रा कोरोना संसर्गाचे माध्यम ठरत आहे.

राजुरा तालुक्यातील वेकोलिच्या सास्ती धोपटाला येथील कोळसा खाण कामगारांच्या वसाहतीजवळ आयटक व बीएमएम या कामगार संघटनांचे कार्यालय आहे. या समोरच रस्त्याचे बाजूला एक सीमेंटचा चबुतरा आहे. कामगार खाणीतील काम संपल्यावर सायंकाळी या चबुतऱ्यावर येऊन गप्पागोष्टी करीत टाइमपास करीत असायचे. या ठिकाणी याच वसाहतीतिल सहा कामगार मित्रांचा एकत्र यायचे. हिवाळा, उन्हाळा आणि पावसाळा असो त्यात कधीच खंड पडला नाही. यावेळी गप्पा गोष्टी व्हायच्या. सोबतच त्या गप्पा गोष्टींना रंगत मिळायची ती खर्रा व तंबाखूची. कोरोना काळ असतानाही त्यांचे जिवलगपणा सुरूच होता.
गोष्टी करता करता एकमेकांना खर्रा भरविण्यात त्यांना मित्रत्वाचा खरा अनुभव येत होता. ना मास्क, शारीरिक अंतर त्यामुळे. यापैकी एकाला ताप आला आणी त्याने कोरोना तपासणी केली तेव्हा त्याला कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याचे निदान झाले. यानंतर या सर्वच मित्रांनी कोरोना तपासणी केली. तपासणी नंतर सर्वच सहाही मित्र पॉझिटिव्ह आले. यापैकी एकाला चंद्रपूरला बेड न मिळाल्याने त्याला अमरावतीला पाठविण्यात आले आहे.
जिल्हा प्रशासन करीत असलेल्या त्रिसूत्रींच्या आवाहनाला नागरिकांनी प्रतिसाद दिल्यास अशा घटनांपासून स्वतःला वाचविता येऊ शकते,त्यामुळे नागरिकांनी कोरोना संपला आहे या मानसिकतेतून बाहेर येऊन मास्कचा नियमित करावा, वारंवार हात धुणे आणि शारीरिक अंतर राखणे या गोष्टी करणे आता अगत्याचे ठरले आहे.