भक्ष्याच्या शोर्धात घरी आलेल्या पट्टेदार वाघाचा महिलेवर हल्ला

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

• महिला गंभीर जखमी ; सिंदेवाही तालुक्यातील घटना

चंद्रपूर : सिंदेवाही तालुक्यातील 16 किमी अंतरावरील अतीदुर्गम भागात वसलेल्या खैरी(चक) या गावात शेळ्यांना भक्ष्य करण्यासाठी आलेल्या पट्टेदार वाघाने शेळ्यांच्या बचावासाठी पुढे आलेल्या महिलेवर हल्ला चढविला. समयसुचकतेने महिला बचावली आहे मात्र ती गंभीर जखमी झाली आहे. हि घटना काल शुक्रवारच्या रात्रीला घडली आहे. या घटनेमुळे गावात दहशत पसरली आहे. सुनंदा मेश्राम (60) असे जखमी महिलेचे नाव आहे.

सिंदेवाही वनपरिक्षेत्रांतर्गखैरी चक गाव जंगलात वसले आहे गावा सभोवती घनदाट जंगल असल्यामुळे नागरिक दहशत वातावरणात जीवन जगत आहेत. विविध गरजांकरिता जंगलात जाणा-या नागरिकांशी वाघाच्या घटनाही घडलेल्या आहेत. याच जंगलात पाळीव जनावरांचे वाघाच्या हल्यात जीव गेलेले आहेत. जंगलातील वन्यप्राणी आता गावात येवून पाळीव जनावरांची शिकार करीत आहेत.
शुक्रवारच्या रात्रीला वाघाने 60 वर्षीय महिला सुनंदा मेश्राम यांचे घरी प्रवेश केला. घरी बांधून असलेल्या शेळ्यांना आपले भक्ष्य करणार तयारीत असताना घरात असलेल्या महिलेला घरी काहितरी आल्याची चाहूल लागली. शेळ्यांवर हल्लाकरीत भक्ष्य करणार तेवढ्यात महिलेने घराचा दरवाजा उघडला. ऐन भक्ष्य तोंडात येणार असतानाच दरवाजा खाडकन उघडल्याने त्या पट्टेदार वाघाने भक्ष्या ऐवजी महिलेवरच हल्ला चढविला. यात महिला गंभीर जखमी झाली. वाघाने हल्ला चढविल्यानंतर महिलेने प्रचंड आरडाओरड करताच घरातील व घराशेजारील नागरिक धावून आले. आणि वाघाने जंगलाच्यादिशेने धुम ठोकली. महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सिंदेवाही वनपरिक्षेत्रा अंतर्गत येत असलेल्या खैरी गावाला लागूनच घनदाट जंगल आहे. त्याच जंगलात वन्यजीवांचा वास्तव्य आहे. त्या लगत मोठा जलाशय आहे. तेथेच हिंस्त्र प्राणी पाणी पिण्यासाठी येतात. खैरी या छोट्याशा गावात राहात असलेली आणि अठरा विश्व दारिद्र्यात जीवन जगत असलेली सुंनदा मेश्राम मोलमजुरी करून आपली उपजिविका करीत आहे. वन्यप्राण्यांच्या अशा गंभीर घटना घडत असल्याने वनविभागाकडुन जंगलात न जाण्याचा सल्ला दिला जात आहे. परंतु ह्या गंभीर हल्ल्याच्या घटना गावागावात घडत असल्याने आता गाव सोडून जायचे कां? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. वनविभागाने अशा घटनेचे गांभीर्य लक्षात घेता वाघांचा त्वरीत बंदोबस्त करण्यासाठी प्रयत्न करावे आणि जखमी महिलेला आर्थिक मदत द्यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.