यवतमाळ : गत 24 तासात जिल्ह्यात एकूण 26 मृत्यु झाले असून यातील 19 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तर सहा मृत्यु खाजगी रुग्णालयात झाले आहे. एकाचा मृत्यु रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीच (ब्रॉड डेथ) झाला. एकूण 26 मृतांपैकी पाच मृत्यु यवतमाळ जिल्ह्याबाहेरील आहे. तसेच शनिवारी 1048 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तर वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 640 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात झालेल्या मृतांमध्ये यवतमाळ येथील 50, 74, 92 वर्षीय पुरुष व 66 वर्षीय महिला, यवतमाळ तालुक्यातील 75 वर्षीय पुरुष व 26 वर्षीय महिला, राळेगाव येथील 75 वर्षीय पुरुष, कळंब येथील 55 व 70 वर्षीय पुरुष, केळापूर येथील 42 वर्षीय पुरुष, झरीजामणी तालुक्यातील 49 वर्षीय पुरुष, दिग्रस येथील 60 वर्षीय पुरुष, घाटंजी तालुक्यातील 54 वर्षीय पुरुष, पुसद तालुक्यातील 60 व 65 वर्षीय पुरुष, धामणगाव येथील 43 वर्षीय महिला, माहूर येथील 42 वर्षीय पुरुष, वाशिम येथील 62 वर्षीय पुरुष आणि नांदेड येथील 52 वर्षीय महिलेचा समावेश आहे. तर खाजगी रुग्णालयात मृत्यु झालेल्यांमध्ये पांढरकवडा येथील 56 वर्षीय महिला, दिग्रस येथील 81 वर्षीय पुरुष, दारव्हा येथील 75 वर्षीय पुरुष, यवतमाळ येथील 70 वर्षीय पुरुष, वणी येथील 57 वर्षीय महिला आणि वाशिम येथील 73 वर्षीय महिला आहे. तर पांढरकवडा येथील 60 वर्षीय पुरुषाचा रुग्णालयात पोहचण्यापूर्वीच मृत्यु झाला.
शनिवारी पॉझेटिव्ह आलेल्या 1048 जणांमध्ये 598 पुरुष आणि 450 महिला आहेत. यात यवतमाळ येथील 284 पॉझेटिव्ह रुग्ण, पुसद 93, पांढरकवडा 110, उमरखेड 127, कळंब 53, वणी 51, दिग्रस 36, मारेगाव 39, घाटंजी 9, आर्णि 34, बाभुळगाव 17, नेर 36, महागाव 51, झरीजामणी 65, दारव्हा 19, राळेगाव 15 आणि इतर शहरातील 9 रुग्ण आहे.
शनिवारी एकूण 5483 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 1048 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 4435 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 5369 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह असून यापैकी रुग्णालयात भरती 2641 तर गृह विलगीकरणात 2728 रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 39572 झाली आहे. 24 तासात 640 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 33334 आहे. तर जिल्ह्यात एकूण 869 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 11.71 असून मृत्युदर 2.20 आहे.
सुरवातीपासून आतापर्यंत 337909 नमुने पाठविले असून यापैकी 335319 प्राप्त तर 2590 अप्राप्त आहेत. तसेच 295747 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे.
जिल्ह्यातील रुग्णालयात असलेल्या बेडची उपलब्धता :
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 577 बेडपैकी 573 बेड रुग्णांसाठी उपयोगात तर 4 बेड शिल्लक आहेत. यात आयसीयु युनीटमधील 80 पैकी 80 रुग्णांसाठी उपयोगात, 410 ऑक्सीजन बेडपैकी 410 उपयोगात आणि 87 साधारण बेडपैकी 83 रुग्णांनी फुल भरले असून चार बेड शिल्लक आहे.
दारव्हा, पुसद आणि पांढरकवडा येथील डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये एकूण 180 बेडपैकी 93 रुग्णांसाठी उपयोगात तर 87 बेड शिल्लक आहेत. यात तिनही सेंटरमध्ये ऑक्सीजन बेडची संख्या 90 असून यापैकी 14 उपयोगात तर 76 शिल्लक, साधारण बेड 90 असून यापैकी 79 उपयोगात तर 11 बेड शिल्लक आहेत. तसेच जिल्ह्यातील 19 खाजगी कोव्हीड रुग्णालयांमध्ये एकूण 709 बेडपैकी 524 रुग्णांसाठी उपयोगात असून 185 बेड शिल्लक आहेत. यात 177 आयसीयु बेडपैकी 157 उपयोगात, 20 शिल्लक, 405 ऑक्सीजन बेडपैकी 312 उपयोगात, 93 शिल्लक आणि 127 साधारण बेडपैकी 55 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 72 बेड शिल्लक आहेत.