वयात आलेल्या मुलीवर वडिलाची वाईट नजर

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

मुलीची रामनगर पोलीसात तक्रार

चंद्रपूर : वयात आलेल्या मुलीवर वाईट नजर ठेवून घरी कुणीही नसल्याची संधी साधून वडिलाने अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मुलीने वडिलांविरोधात पोलीस ठाण्यात विनयभंगाची तक्रार दाखल केली.

येथील बंगाली कॅम्प परिसरातील कुटुंबात मुलगा, मुलगी अशी दोन अपत्ये आहेत. दहावीनंतर मुलगी आईसोबत घरकाम करण्यासाठी जायची. मात्र, वडील कोणतेच काम करीत नाही. त्याची वयात आलेल्या मुलीवर वाईट नजर होती. मागील वर्षी लागू करण्यात आलेल्या लाकडाउन काळात एक दिवस घरी कुणीही नसल्याची संधी साधून वडिलाने मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला.

मात्र, मुलीने धक्का देत घराबाहेर पळ काढला. या घटनेची माहिती आईला दिली. त्यानंतर वडिलाला घराबाहेर काढून देण्यात आले. तब्बल तीन महिन्यांनी आईला फोन करून अपघात झाल्याने घरी नेण्याची विनंती केली. यावेळी यापुढे तसा प्रकार होणार नसल्याचे सांगून माफी मागितली. मात्र, मागील काही दिवसांपासून पुन्हा वडिलांकडून त्रास देणे सुरु झाले आहे. अखेर या प्रकाराला कंटाळून मुलीने रामनगर पोलीस ठाण्यात वडिलांविरोधात विनयभंगाची तक्रार दाखल केली आहे.