पुरात वाहून गेल्याने मुलीच्या मृत्यू

चंद्रपुर : पाऊस आल्यामुळे शेतातून घरी परत येत असताना वाटेतील नाल्यामध्ये आलेल्या पुरात 14 वर्षीय मुलगी वाहून गेल्याने तिचा मृत्यू झाला. करिष्मा मुक्त सिडाम असे मृत मुलीचे नाव आहे.

जिवती तालुक्यातील चिखली,कोलामगुडा येथिल करिश्मा मुत्ता सिडाम ( 14 )ही शेतीचे काम करण्यासाठी शेतात गेली होती. अचानक पाऊस आल्याने करिश्मा घराकडे ती काही महिलांसोबत घराकडे परत येत असताना पुरात वाहून गेल्याने तिच्या मृत्यू झाला.

सदर मुलीचा मृतदेह एक किलोमीटर पर्यंत वाहून गेला. घटनेची माहिती मिळताच पाटण पोलीसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व मृतदेह शव विच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय गडचांदुर येथे पाठविण्यात आला. करिश्मा चा अचानक जाण्याने परिसरात हळहळत व्यक्त केली जात आहे. करिश्माच्या कुटुंबियांना शासनाकडून आर्थिक मदत देण्याची मागणी होत आहे.