• लाखांदूर तालुक्यातील दीघोरी(मोठी) येथील घटना
भंडारा : लाखांदूर तालुक्यातील दिघोरी शेत शिवारात काम करीत असताना अचानक विज कोसळून ९ महिला जखमी झाल्याची घटना घडली. दिघोरी शेत शिवारात काम करीत असताना अचानक मेघगर्जना सह विजाचा कडकडाट व पावसाला सुरुवात झाली.
अचानक विज कोसळली मात्र कोणतीही दुर्देवी घटना घडली नाही. त्यात ९ महिलेचे प्राण वाचले. यात रिंकू करंजेकर, रंजू करंजेकर, उषा अवचट, प्रमिला करंजेकर, सुमित्रा अवचट, शालू करंजकर, सुषमा करंजेकर, सीमा करंजेकर व भागवत या महिला जखमी झाले असून यातील दोन महिलांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दिघोरी मोठी येथे उपचार सुरू आहे.