पतीची आत्महत्या तर पत्नीचा उपचारादरम्यान मृत्यू

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

• पतीने पत्नीला मारहाण केल्याचा संशय
• घुग्घुस येथील अमराई वार्डातील घटना

चंद्रपूर : पहाटेच्या सुमारास घराच्या बाहेर कडू लिंबाच्या झाडाला नायलॉन दोरीने पतीने गळफास लावून आत्महत्या केल्यानंतर काही वेळातच पत्नीनेही आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र समय सूचकतेने पत्नीला वेळीच रूग्णालयात भरती करण्यात आले. मात्र सायंकाळच्या सुमारास पत्नीचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पत्नीने आत्महत्येचा प्रयत्न नव्हे तर पतीने मारहाण केल्याने तिचा मृत्यू झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

आज मंगळवारी घुग्घूस येथील अमराई वार्डात सकाळच्या सुरज सुरत गंगाधर माने याचा तर सायंकाळी रूग्णालयात पत्नी रत्नमाला उर्फ सोनी हिचा मृत्यू झाला आहे. आज मंगळवारी 17 ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास घुग्घुस येथील अमराई वार्ड क्र.1 येथील सुरज गंगाधर माने (28) यांनी घराच्या अंगणातील कडुनिंबाच्या झाडाच्या फांदीला नायलनच्या दोरीने गळफास लावून आत्महत्या केली तर काही वेळातच त्याची पत्नी रत्नमाला उर्फ सोनी माने (25) पत्नीने आत्महत्येचा प्रयत्न केला परंतु समयसुचकतेने तिचे जीव वाचविण्यात यश आले.

सदर घटनेची माहिती होताच काही राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी रुग्णवाहीका बोलावून गंभीर अवस्थेत असलेल्या पत्नी रत्नमाला माने हिला घुग्घुस प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी हलविले परंतु प्रकृर्ती अत्यवस्थ झाल्याने चंद्रपूर येथे हलविण्यात आले. उपचार सुरू असताना मंगळवारी सायंकाळी रूग्णालयात पत्नीचाही मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पत्नीने आत्महत्येचा प्रयत्न नव्हे तर पतीने आत्महत्या करण्यापूर्वी तिला जबर मारहाण केली. यात तिच्या डोक्याला जबर मार लागला. यात ती गंभीर जखमी झाली उपचारादरम्यान सायंकाळी पत्नीचा तर सकाळी पतीने आत्महत्या करून जिवनयात्रा संपविली आहे. सुरज व रत्नमाला यांचा प्रेमाविवाह असून त्यांना आयुष 4 वर्षाचा व आर्यन 2 वर्षाचा अशी दोन लहान मुल आहेत.

कौटुंबिक वादातून ही घटना घडली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. मात्र दोघांच्याही मृत्यूने दोन्ही मुले उघड्यावर आली आहेत.
पुढील तपास घुग्घुस पोलीस करीत आहे.