ग्रा.पं.चुनाळा येथे 38.20 लक्ष रु. च्या विकास कामांचा शुभारंभ व लोकार्पण

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

जि.प.अध्यक्ष संध्याताई गुरनुले यांच्या हस्ते संपन्न

चंद्रपूर : राजुरा तालुक्यातील चुनाळा एक महत्वपूर्ण ग्रामपंचायत असून विकास साधण्यास अग्रेसर आहे. येथील ग्रामपंचायतीच्या मालकीचे मोठे ग्राम सचिवालय, लग्नसमारंभासाठी सभागृह, जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या मालकीचे सात एकर परिसरात एकमेव असलेले विश्रामगृहासह गावातील विकासाचा आलेख बघता गावाच्या विकासासाठी माजी आमदार सुदर्शन निमकरांनी जिल्हा परिषदेकडे मागीतलेला निधी देण्यास जि.प.कटीबद्ध असून आवश्यक निधी दिला जाईल असे मत चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. संध्याताई गुरनुले यांनी चुनाळा येथे आयोजित विविध विकास कामांच्या भुमिपूजन, शुभारंभ व उद्घाटन सोहळ्याप्रसंगी बोलतांना व्यक्त केले.

स्वातंत्र्य दिनाच्या पुर्वसंध्येला (दि.१४) ग्राम पंचायत चुनाळा येथे गावातिल विविध विकास कामांचा भुमिपूजन, शुभारंभ व उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परीषद चंद्रपूर च्या अध्यक्षा सौ.संध्याताई गुरनुले यांनी केले. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून राजुरा चे माजी आमदार सुदर्शन निमकर, मुख्य अतिथी म्हणून जि.प. चे कृषी व पशुसंवर्धन सभापती सुनिल उरकुडे, प्रमुख पाहुणे म्हणून पं.स. सदस्य तुकाराम माणुसमारे, राजुरा चे संवर्ग विकास अधिकारी डॉ. ओमप्रकाश रामावत, महिला व बालकल्याण अधिकारी सौ.वैशाली सटाले, चुनाळा चे सरपंच बाळनाथ वडस्कर, माजी सरपंच संजय पावडे, माजी ग्रा.पं.सदस्य प्रा.शंकरराव पेद्दुरवार, ग्राम पंचायत सदस्य सर्वश्री रवींद्र गायकवाड, उषा करमनकर, जया निखाडे, राकेश कार्लेकर, संतोषी साळवे, राजु किनेकर, वंदना पिदूरकर, कोमल काटम, सचिन कांबळे, अर्चना आत्राम, संतोषी निमकर, दिनकर कोडापे, ग्रा.पं.चे ग्राम विकास अधिकारी मोरेश्वर कोमटी आदी उपस्थित होते.

याप्रसंगी गावातील हायमाक्स पथदिव्यांचे लोकार्पण 1.20 लक्ष, आंगणवाडी क्र. 3 च्या इमारत बांधकामाचा शुभारंभ 8.50 लक्ष, श्री जय बजरंगी व्यायाम शाळेचे उद्घाटन 7 लक्ष, मोक्षधाम परिसरातील संरक्षण भिंत बांधकाम 10 लक्ष व अंतर्गत काँक्रीट रस्त्यांच्या कामाचे भुमिपूजन 3 लक्ष, आंगणवाडी केंद्र क्र. 2 च्या इमारत बांधकामाचा शुभारंभ 8.50 अश्या एकूण 38 लक्ष 20 हजार रु. च्या विकासकामांचे भूमिपूजन व उदघाटन करण्यात आले.

याप्रसंगी गावाच्या विकासासाठी राजुरा चे माजी आमदार सुदर्शन निमकर यांचे मोठे योगदान असून गावातील विकासाच्या दृष्टीने आवश्यक निधी खेचून आणण्याचे काम त्यांच्या माध्यमातून होत असून ग्राम पंचायतीची संपूर्ण टीम त्यांच्या मार्गदर्शनात काम करीत असल्याचे मत सरपंच बाळू वडस्कर यांनी आपल्या प्रास्ताविकातून केले. याप्रसंगी जि.प. कृषी व पशुसंवर्धन सभापती सुनिल उरकुडे यांनी गावातील नागरीकांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे याकरीता जिल्हा निधी अंतर्गत 7 लक्ष रूपयाचे आर.ओ. प्लॉट मंजूर करणार असल्याची घोषणा केली तर जि.प. अध्यक्ष यांनी ग्राम पंचातीच्या सभागृहाच्या दुरूस्तीसाठी 5 लक्ष तर इतर कामांसाठी माजी आमदार निमकरांनी या अगोदर मागणी केलेला निधी देण्याचे आश्वासन दिले.
कार्यक्रमाचे संचालन जि.प. शाळेच्या शिक्षीका वंदना पेटकर यांनी तर उपस्थितांचे आभार ग्राम पंचायत सदस्या उषा करमनकर यांनी मानले.