घुग्घुस येथील पती – पत्नीच्या संशयित मृत्यू प्रकरणाचे उच्वस्तरीय चौकशी करा 

काँग्रेस तर्फे पोलीस स्टेशनला निवेदन

घुग्घुस : येथील अमराई वॉर्ड क्रं एक येथे राहणारे सुरज गंगाधर माने वय 28 वर्ष यांचे मृतदेह पहाटेच्या सुमारास घराबाहेर कडू लिंबाच्या झाडाला गळफास घेतल्याचा स्तिथीत आढळला त्यांचे पाय जमिनीवरच असल्याने संशय वाढला असतानाच त्याची पत्नी रत्नमाला उर्फ सोनी माने या गंभीर रित्या घायाळ स्तिथीत आढळल्या त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मात्र सांयकाळच्या सुमारास त्यांचा हा मृत्यू झाला
या दाम्पत्याला दोन छोटी – छोटी मुलं आहेत.
परिसरातील नागरिकांचा दाट संशय आहे की या पती – पत्नीचे आत्महत्या नसून हत्याच आहे.
याप्रकरणाचा सखोल तपास करून सत्य परिस्थिती जनतेच्या समोर आणावी व या प्रकरणाचा उलगडा करून दोषीना कठोर शिक्षा करावी या मागणीचे निवेदन घुग्घुस काँग्रेस काँग्रेस कमिती शिष्टमंडळाने ठाणेदारांना दिले.
याप्रसंगी शहर अध्यक्ष राजुरेड्डी, कामगार नेते सैय्यद अनवर, नुरुल सिद्दिकी, रोशन दंतलवार, विशाल मादर, व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.