
चंद्रपूर : जिल्ह्यात एकट्या काँग्रेसने 65 टक्के, तर महाविकास आघाडीच्या मिळून 75 टक्के ग्रामपंचायतीत विजय मिळाल्याचा दावा राज्याचे मदत व पुनर्वसन आणि जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केलाय. आज जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल धीम्या गतीने येत आहेत.
पूर्ण चित्र अद्याप स्पष्ट व्हायचे आहे. त्यापूर्वीच वडेट्टीवार यांनी आघाडीला 75 टक्के यश मिळाल्याचा दावा केलाय. हा दावा करतानाच हा निकाल म्हणजे जनतेने महाविकास आघाडीच्या कारभाराला दिलेली पसंती आहे, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.