विजयी उमेदवारांनी घेतली आमदार जोरगेवार यांची घेतली भेट ;  उसगाव येथील विजयी उमेदवारांचा सत्कार

0
260
Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

चंद्रपूर : आज ग्रामपंचायत निवडणूकींचा निकाल जाहिर झाला आहे. यात विजयी झालेल्या अनेक उमेदवारांनी आमदार किशोर जोरगेवार यांची भेट घेतली. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी सदर उमेदवारांच्या गळ्यात विजयाची माळ टाकून सत्कार केला.

आज ग्रामपंचायत निवडणुकींचा निकाल जाहिर झाला यासाठी चंद्रपूरातील तहसील कार्यालय येथे व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी सर्वच पक्षाच्या उमेदवार व कार्यकर्त्यांनी येथे गर्दी केली होती. निकाल जाहिर होताच विजयी उमेदवारांनी उत्साह साजरा केला. दरम्याण विजयी झालेल्या अनेक उमेदवारांनी आमदार किशोर जोरगेवार यांची भेट घेतली. यावेळी आ. किशोर जोरगेवार यांनीही विजयी उमेदवारांच्या गळ्यात विजयाची माळ टाकून त्यांचा सत्कार केला.