गडचांदूर शहरात भीषण आग; घर जळून खाक

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

•जिवीतहाणी टळली, सुमारे आठ लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज

चंद्रपूर : गडचांदूर पिंपळगाव रोडवरील वार्ड न,6 मध्ये राहणाऱ्या देवराव कल्लुरवार यांच्या घराला मध्यरात्री 1,30 च्या सुमारास अचानक आग लागली. या भीषण आगीत संपूर्ण घर जळून खाक झाले. सुमारे 8 लाखांचे आर्थिक नुकसान झाले असल्याचा अंदाज आहे.
मध्यरात्रीच्या सुमारास अचानक कल्लुरवार यांच्या घराला लागलेल्या आगीने क्षणात रुद्र रूप धारण केले. शेजारच्या नागरिकानी तसेच नगरसेवक रामा मोरे यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. तसेच घरातील महिलांना, बालकांना घराबाहेर काढलयाने जिवीतहाणी टळली. लगेव पोलीस स्टेशनला माहिती दिली, ठाणेदार गोपाल भारती यांनी तात्काळ माणिकगड सिमेंट व अल्ट्रा टेक सिमेंटच्या अग्निशमन दलाच्या गाड्या बोलीवल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळविले. आज सकाळी पटवारी व पोलिसांनी पंचनामा केला. सदर आग शॉर्ट सर्किटमुळे लागलयाचा अंदाज वर्तविल्या जात आहे. लगेतच्या धनंजय चांदेकर यांच्या घराला सुद्धा या आगीची झळ लागली. त्यांचे सुद्धा नुकसान झाले आहे. कल्लुरवर यांचे संपूर्ण घर जळल्यामुळे घरातील सर्व जीवनावश्यक वस्तू नष्ट झाल्या. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष शरद जोगी यांनी पक्षाच्या वतीने त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत केली तसेच जीवनावश्यक वस्तू व किराणा पुरविला.

◆ भद्रावती शहरातील फुकटनगर परिसरात आग
भद्रावती शहरातील फुकटनगर परिसरातील मागच्या बाजूला मोकळ्या मैदानातील झाडेझुडपांना तथा गवताला आग लागल्याची घटना आज रविवारी दुपारी १.३० वाजताच्या दरम्यान घडली. मात्र येथील नागरिकांनी प्रसंगावधानता दाखवत एकत्र येऊन ही आग विझविल्याने मोठा अनर्थ टळला.या घटनेची माहिती भद्रावती नगर परिषदेला देण्यात आल्यानंतर नगर परिषदेचे अग्निशमन दल त्वरित घटनास्थळी पोहचले. त्याआधीच नागरिकांनी जवळपास संपूर्ण आगीवर ताबा मिळविला होता. अग्निशमन दलाने नंतर ही आग पूर्णपणे विझविली.सदर आग कशामुळे लागली हे कळू शकले नाही.फुकटनगरच्या मागे झाडेझुडपे असलेले मोकळे मैदान आहे. या नगरातील मागच्या भागातील घरांच्या अगदी जवळ ही आग लागून पाहतापाहता पसरली मात्र नागरिकांनी वेळीच सावधपणा दाखवीत आगीवर नियंत्रन मिळविले.