• आमदार सुभाष धोटे यांचे राजुरा विधानसभा क्षेत्रातील जनतेला आवाहन
चंद्रपूर : संपूर्ण भारतात, महाराष्ट्रात आणि चंद्रपूर जिल्हयासह राजुरा विधानसभा क्षेत्रात कोरोनाचा वाढता संक्रमण लक्ष्यात घेता आज दिनक १८ एप्रिल २०२१ रोजी उपविभागीय कार्यालय राजुरा येथे राजुरा, कोरपना, गडचांदूर येथील व्यापारी बांधवांची बैठक आयोजित करण्यात आली. कोरोना संक्रमणाची साकडी कमी करावयाची असल्यास जनता कर्फ्यू शिवाय पर्याय नाही त्यामुळे जनतेनी स्वयंस्फूर्तीने सहभागी होऊन आठ दिवसाचा जनता कर्फ्यू पाडवा असे सर्वानुमते ठरविण्यात आले. राजुरा विधानसभा मतदार संघात शनिवार रविवार जनता कर्फ्यू पाडला जातो अशाच प्रकारे जनतेनी सोमवार दिनांक १९ एप्रिल ते २६ एप्रिल सोमवार सकाळी ८ वाजेपर्यंत जनता कर्फ्यू पाडून स्वतःचे आरोग्य जपावे. कोरोणाच्या वाढत्या संसर्गामुळे राज्यात आज विदारक परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. अनेकांना आरोग्य सेवेअभावी प्राण गमवावे लागत आहे. ही विदारक परिस्थिती थांबविण्यासाठी, स्थानिक जनतेचे आरोग्य व जिवीताचे संरक्षण करण्यासाठी स्वतः जनतेलाच पुढाकार घेऊन या परिस्थितीचा सामना करावा लागणार आहे. त्यासाठी राजुरा विधानसभा क्षेत्रातील राजुरा , कोरपना, जिवती व गोंडपिपरी तालुक्यातील सर्व जनतेनी जनता कर्फ्युला सहकार्य करून स्वतःची परिवाराची व जनतेची काळजी घेण्याच्या दृष्टीने जनता कार्फ्युला सहकार्य करावे असे आवाहन राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांनी जनतेला केले आहे. यात आरोग्य सेवा वगळता सर्व प्रकारच्या आस्थापना सेवा बंद ठेऊन व्यापारी बांधवांनी सहकार्य करावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
या प्रसंगी उपविभागीय अधिकारी संपत खलाटे, राजूरचे नगराध्यक्ष अरुण धोटे, उपनगराध्य्क्ष सुनील देशपांडे उपविभागीय पोलीस अधिकारी राजा पवार, राजुरा तहसिलदार हरीश गाडे, कोरपना तहसिलदार महेंद्र वाकलेकर, राजुरा पोलीस निरीक्षक चंद्रशेखर बहादुरे, गडचांदूर पोलीस निरीक्षक गोपाल भारती, कोरपना पोलीस स्टेशन चे पोलीस उपनिरीक्षक शिवराज जाधव, मुख्यधिकारी आर्शिया जुही, विशाखा शेळकी कोरपना नगर पंचायतीचे मयूर कांबळे, नगर सेवक रमेश नले, राजु डोहे, राजुरा व्यापारी अशोसीएशनचे सतीश धोटे, गोपाल झंवर, अशोक राव, जितेंद्र देशकर, गणेश रेकलवार, अश्विनभाई पटेल, राजू बंदाली, खालिद भाई, बंडू कलूरवार, इत्यादी व्यापारी बांधव उपस्थित होते.