‘मेरा शहर मेरी जवाबदारी’ घुग्घुस काँग्रेसतर्फे स्वच्छता अभियानाला सुरुवात

घुग्घुस : वेकोलीच्या सुभाष नगर, गांधी नगर, शालीकराम नगर,परिसरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे.

याची तक्रार कॉलोनी वासीयांनी घुग्घुस काँग्रेस अध्यक्ष राजूरेड्डी यांना केली असता संपूर्ण घुग्घुस शहराचा कायापालट करण्याची जवाबदारी राजूरेड्डी यांनी घेतली

असून निःशुल्क पाणी वाटपा सोबत आता ट्रॅक्टर व कामगार यांच्या मददतीने संपूर्ण शहरात ” मेरा शहर मेरी जवाबदारी” स्वच्छता अभियानाला राजूरेड्डी यांच्या नेतृत्वाखाली गांधी नगर येथून सकाळी 10 वाजता पासून सुरुवात करण्यात आली.

याप्रसंगी जिल्हा किसान सेल जिल्हाध्यक्ष राजूरेड्डी, अनुसूचित जाती विभाग जिल्हाध्यक्ष पवन आगदारी, कामगार नेते सैय्यद अनवर, युवक काँग्रेस नेते सुरज कन्नूर, युवक अध्यक्ष तौफिक शेख, सुकमार गुंडेटी,सिनू गुडला, विजय माटला, नुरुल सिद्दिकी, इर्शाद कुरेशी, रोशन दंतलवार, आरिफ शेख, सुनील पाटील, जुबेर शेख, राजकुमार मूळे, अंकेश मडावी, वस्सी शेख, व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.