शेकडो संतप्त महिलांची घुग्घुस पोलीस ठाण्यात धडक
घुग्घुस : मंगळवार 17 ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास घुग्घुस येथील अमराई वार्ड क्र.1 येथे राहणारे सुरज गंगाधर माने (28) यांनी घराच्या अंगणातील झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. त्यानंतर घरात जखमी अवस्थेत आढळलेल्या त्यांच्या पत्नी रत्नमाला माने (25) यांचा सायंकाळी दरम्यान चंद्रपूर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला.
एकाच दिवशी पती पत्नीचा मृत्यू झाल्याने घुग्घुस एकच शहरात खळबळ उडाली. परंतु ही आत्महत्या नसून हत्या झाली आहे असे तर्कवितर्क केले जात होते.
मृतक रत्नमाला माने यांचे वडील फिर्यादी शंकर कोलियानी (49) रा. अमराई वार्ड.1 घुग्घुस यांनी हत्या झाल्याची घुग्घुस पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली तक्रारी वरून कलम 302 गुन्हा दाखल करण्यात आला.
बुधवार 18 ऑगस्ट रोजी सकाळी अमराई वार्डातील मृतकाच्या कुटुंबियांनी व जवळपास 300 च्या संख्येत महिला व पुरुषांनी घुग्घुस पोलीस स्टेशन येथे धडक दिली.
ही माहिती मिळताच घुग्घुस काँग्रेसचे शहर अध्यक्ष राजूरेड्डी, किसान काँग्रेस जिल्हाध्यक्ष रोशन पचारे, कामगार नेते सैय्यद अनवर, भाजयुमोचे विवेक बोढे, बिआरएसपीचे सुरेश पाईकराव, काँग्रेसचे गणेश उईके, युवासेनेचे हेमराज बावणे, गंगाधर गायकवाड, भारत साळवे, यांनी पोलीस स्टेशन येथे धाव घेतली.
जमलेल्या संतप्त जमावाने आरोपीस तात्काळ अटक करा अशी मागणी रेटून धरली त्यामुळे घुग्घुस पोलीस स्टेशन येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले.
यावेळी जमलेल्या नागरिकांनी संताप व्यक्त करीत माने कुटुंबियांना न्याय मिळाला पाहिजे, आरोपीना अटक करा अशी नरेबाजी केली. संतप्त महिलांनी पोलीस ठाण्यातच ठिय्या मांडला. दुपारी 1 वाजता दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी शिलवंत नांदेडकर हे घुग्घुस पोलीस स्टेशन येथे दाखल झाले तर 2 वाजता दरम्यान दंगा नियंत्रण पथक ही दाखल झाले.
जवळपास तीन तास जमाव घुग्घुस पोलीस स्टेशन येथे ठाण मांडून होता शेवटी उपविभागीय पोलीस अधिकारी शिलवंत नांदेडकर यांच्याशी मृतकांच्या कुटुंबियांची सर्वपक्षीय नेत्यांनी चर्चा घडवून आणली नंतर पोलिसांनी व दंगा नियंत्रण पाथकाने जमवाला पोलीस स्टेशन बाहेर समजुतीने काढले. सध्या तणाव पूर्ण शांतता शहरात आहे.