Gopani Iron & Power (India) Pvt Ltd कंपनी कामगारांना परराज्यात हलविण्याच्या हालचाली

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

◆ सेल्गा स्टिल इंडस्ट्रीजच्या कंत्राटदाराची कायर्वाही
◆ कामगारांचे आंदोलन दडपण्याचा कंत्राटदारांचा डाव
◆ आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी सोमवारी पालकमंत्री वडेट्टीवार यांचेसोबत बैठक

चंद्रपूर : सेंट्रल MIDC ताडाळी येथील Gopani Iron & Power (India) Pvt Ltd या कंपनी ने 10 सप्टेंबर रोजी कंत्राटदारांचे कंत्राट बंद केल्याने 8 दिवसापासून सुमारे 450 कामगारांना बेरोजगार व्हावे लागले होते. मात्र यापैकी सेल्गा स्टिल इंडस्ट्रीज या कंत्राटदाराने आपल्या कामगारांची ईतर राज्यात बदली केली आहे. याची सुचना कारखान्याच्या बाहेर असलेल्या नोटिस बोर्डवर 17 सप्टेंबर शुक्रवारी पहाटे लावण्यात आली. त्यामुळे व्यवस्थापनाचा हा पवित्रा कामगारांचे आंदोलन दडपण्यासाठी असल्याचे मत कामगारांत व्यक्त करण्यात येत आहे.

कारखान्यात काम नसल्याचे कारण देत सुरुवातीला 120 कामगारांना कामावरून कमी करण्यात आले. त्यानंतर 10 सप्टेंबर रोजी सर्वच कंत्राटदारांचे कंत्राट संपवून कामगारांना बेरोजगार करण्यात आले. त्यामुळे 13 सप्टेंबर रोजी सहाय्यक कामगार आयुक्त यांच्या कक्षामध्ये या विषयावर बैठक आयोजीत करण्यात आली होती. मात्र आता यापैकी सेल्गा स्टिल इंडस्ट्रीज या कंत्राटदाराने आपल्या एकूण 103 कामगारांची बदली करण्यात येत असल्या बाबतची सुचना कारखान्याच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या फलकावर प्रसिद्ध केली आहे.

ही बदली सेल्गा स्टिल इंडस्ट्रीजच्या टाटा स्टिल लिमी. ओरिसा, जेएसडब्ल्यू कर्नाटका, टाटा स्टिल लिमी. झारखंड, जिंदाल स्टिल अॅण्ड पॉवर लिमी. ओरिसा व जिंदाल स्टेनलेस स्टिल लिमी. ओरिसा या ठिकाणी करण्यात आलेली आहे. कामगारांची ही बदली तात्काळ स्वरूपाची असून सात दिवसांच्या आत कामावर रूजू होण्याची सुचनाही कामगारांना करण्यात आलेली आहे.

कामगारांची दिशाभूल करून कामगारांत फूट पाडण्याचा प्रयत्न गोपानी व्यवस्थापनाकडून करण्यात येत आहे. एकही कामगार बदली करण्यात आलेल्या परप्रांतात कामासाठी जाणार नाही. सोमवारी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यानंतर समोरची रणनीती ठरविण्यात येईल.
: दिनेश चोखारे अध्यक्ष, गोपानी स्पंज आयरन कामगार संघटना, ताडाळी