चंद्रपुरात “इरई नदी बचाओ आंदोलन” पार पडले

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

◆ विदर्भ किसान मजदूर काँग्रेस शहरच्या वतीने आंदोलन

चंद्रपूर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी खासदार . नरेश पुगलिया यांच्या मार्गदर्शनात विदर्भ किसान मजदूर काँग्रेसच्या वतीने आज शनिवारी (१८ सप्टेंबर, २०२१) रोजी काँग्रेसचे युवा नेते राहूल पुगलिया यांच्या नेतृत्वात ईरई नदीच्या पात्रात व पूलावर ईरई नदी बचाव आंदोलन करण्यात आले.

आंदोलनादरम्यान, नदीपात्रातील पाण्याची पातळी वाढविणे व चंद्रपूर शहराला अधिक व भरपर प्रमाणात पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी इरई नदीवर बंधारा बांधण्यात यावा, इरई नदीचे खोलीकरण व सौंदर्यीकरण करण्यात यावे. इरई नदीवर उड्डाणपूल झाल्यानंतर नदी पात्रातील मातीचे ढिगारे व पूर्वीच्या जून्या पूलाचे अवशेष हटवून नदी स्वच्छ करण्यात यावी. उड्डाण पूलाचे बांधकाम सुरू असतांना नदी पात्रात निर्माण झालेले मातीचे ढिगारे आज नदीला स्थायी स्वरूपात उथळ करून प्रवाह बाधित करीत आहेत. त्या ढिगा-यावर मोठ्या प्रमाणात झुडपी जंगले वाढून नदीचा प्रवाह बाधित झाला आहे व नदीला नाल्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. नदी पात्रातील सर्व ढिगारे हटवून नदीचे खोलीकरण करण्यात यावे. नदीच्या तीरावरील परीसरात श्री गणेश विसर्जन, गौरी पूजन, छट पूजा व इतर धार्मिक व सामाजिक कार्यक्रमासाठी ओटे ( प्लॅटफार्म ) तयार करून त्याला लागून घाट व पाय-या बांधण्यात याव्यात. याच परीसरात चौपाटी सारखे विकास करून सौंदर्यीकरण करण्यात यावे.
आदी विकास कामे जिल्हयाच्या खनिज विकास निधीतून तयार करण्यात यावी. याबाबतचे पत्र महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. उध्दवजी ठाकरे यांना पाठविण्यात आले.

” ईरई नदी बचाव ‘, ” ईरई नदीचे खोलीकरण’, “ईरई नदीवर बंधारा झालाच पाहीजे ‘
इत्यादी ना यांनी ईरई नदीचा परीसर निनादून गेला.
याप्रसंगी विदर्भ किसान मजदूर काँग्रेसचे चंद्रपूर ग्रामिण अध्यक्ष सर्वश्री गजाननराव गावंडे, जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष करणबाबू पुगलिया, शहर अध्यक्ष तथा नगरसेवक देवेंद्र बेले, महासचिव तथा नगरसेवक अशोक नागापूरे, इंटकचे जिल्हा अध्यक्ष चंद्रशेखर पोडे, NSUI चे जिल्हा अध्यक्ष स्वप्नील तिवारी, दुर्गेश चौबे,कामगार नेते वसंत मांढरे, विरेंद्र आर्य, रामदास वाग्दरकर, अजय मानवटकर, काँग्रेसचे रतन शिलावार, अजय महाडोळे, प्रतिक तिवारी, बाबूलाल करुणाकर, क्रिष्णा यादव, पृथ्वी जंगम व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.