प्रताप बाबू पवार (18) हे बेपत्ता झालेल्या मुलाचे नाव आहे. बुधवारी सायंकाळी सहा वाजता जिवती पोलिसांनी बाबू मुन्ना पवार यांना पकडून नेले. याची माहिती मुलाला मिळताच तो ठाण्यात विचारपूस करण्यासाठी आला. तेव्हाच प्रताप पवार याला पोलिसांकडून अपमानास्पद वागणूक मिळाली.
चंद्रपूर : वडिलांना पोलिसांनी पकडून नेल्याने ठाण्यात विचारपूस करण्यासाठी आलेल्या मुलाला पोलिस हवालदाराने अपमानास्पद वागणूक देऊन मारहाण केली. या घटनेनंतर मुलगाही बेपत्ता झाला. ही घटना बुधवारी सायंकाळी जिवती येथे घडली. दरम्यान, वडील बाबू पवार याने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
प्रताप बाबू पवार (18) हे बेपत्ता झालेल्या मुलाचे नाव आहे. बुधवारी सायंकाळी सहा वाजता जिवती पोलिसांनी बाबू मुन्ना पवार यांना पकडून नेले. याची माहिती मुलाला मिळताच तो ठाण्यात विचारपूस करण्यासाठी आला. तेव्हाच प्रताप पवार याला पोलिसांकडून अपमानास्पद वागणूक मिळाली.
त्याला मारहाण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आले. त्यानंतर त्याने मी घर सोडून जात असल्याचे एका वहीवर लिहले. आपला मोबाईलही त्याने घरी ठेवत तो बाहेर पडला. बापाला सोडविण्यासाठी पोलिस ठाण्यात गेलेल्या मुलाला पोलिसांनी मारहाण केली. अपमानास्पद वागणूक दिल्यानेच माझा मुलगा बेपत्ता झाल्याचा आरोप आईने केला आहे.