घुग्घूस : महिला काँग्रेस तर्फे आयोजित करण्यात आलेल्या “स्त्री शक्तीचा जागर’ महिला संमेलन हळदी कुंकू कार्यक्रम दिनांक 18 फेब्रुवारी रोजी बालाजी लाँन येथे घेण्यात आला या कार्यक्रमात खासदार बाळु भाऊ धानोरकर व शिवानीताई वड्डेटीवार हे प्रमुख पाहूणे होते
कार्यक्रमात महिलेनी उत्स्फूर्त सहभाग घेतला कार्यक्रमात आलेल्या एका ताईचे सोन्याची पोत ही तुटून पडली मात्र गर्दी असल्याने ती मिळू शकली नाही
यामुळे या ताईला रडू कोसळले
त्यावेळी कॉंग्रेस नेते राजुरेड्डी व रोशन पचारे यांनी धीर देत त्यांना आर्थिक मदद देण्याचे वचन दिले व आज शिवजयंती दिनी सदर ताईला काँग्रेस कार्यलयात आर्थिक मदद देऊन दिलेला शब्द पूर्ण केला.
याप्रसंगी कामगार नेते सैय्यद अनवर, जावेद कुरेशी व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.