परिस्थितीचे गांभीर्य पाहता जाचक अटी शिथिल करत खाजगी कोविड रुग्णालये सुरु करण्यास परवानगी द्या :

• चंद्रपूरचे आ. किशोर जोरगेवार यांची राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी

चंद्रपूर : कोरोनाच्या वाढत्या उद्रेकामूळे रुग्णांना बेड अभावी जिव गमवावा लागत आहे. अशा आपातकालीन परिस्थितीत कोरोना रुग्णांना उत्तम उपचार मिळावा, या करिता खाजगी कोरोना रुग्णालया संदर्भातील जाचक अटी शिथिल करुन इच्छुक रुग्णालयांना अटि शर्तीवर कोविड रुग्णालय सुरु करण्याकरीता परवानगी देण्यात यावी अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व उपमूख्यमंत्री अजित पवार यांना पत्राद्वारे केली आहे.

कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. सध्या रुग्ण वाढीचा दर बघता आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण आहे. रुग्ण संख्येच्या तुलनेत बेड कमी पडत असल्याने रुग्णांचे हाल होत आहे. ही परिस्थिती येत्या काही दिवसात आणखी बिकट होण्याची दाट शक्यता आहे. त्यामूळे या दिशेने योग्य उपायोजना करण्याची गरज आहे. अनेक खाजगी रुग्णालये कोविडमध्ये सेवा देण्यासाठी तयार आहे. तसा अर्जही त्यांच्या वतीने प्रशासनाला करण्यात आला आहे. मात्र कोरोना रुग्णालया संदर्भातील जाचक अटिंमूळे त्यांची परवाणगी रखडली आहे. या रुग्णालयातील सेवा सुरु झाल्यास चंद्रपूर जिल्ह्यात जवळपास 200 ते 300 बेड उपलब्ध होवू शकतात ही बाब लक्षात घेता व परिस्थितीचे गांर्भिय पाहाता कोरोना रुग्णालयांसाठी आखून देण्यात आलेल्या जाचक अटी शिथिल करण्यात याव्या व आवश्यक शर्ती अटींवर सदर रुग्णालयांना कोरोना रुग्णालयाची परवाणगी देण्यात यावी अशी मागणी सदर पत्राच्या माध्यमातून आमदार किशोर जोरगेवार यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व उपमूख्यमंत्री अजित पवार यांना केली आहे.