घुग्घुस नगरपरिषदे तर्फे अवैध 21 टील्लू पंप जप्त ;  कारवाई सुरूच

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

चंद्रपूर : घुग्घुस शहरात भीषण पाणी टंचाई असून नागरिकांच्या नळाला देखील पाणी येत नाही.
काही नागरिक हे नळाला टील्लू पंप लावत असल्याची तक्रार नगरपरिषदेला प्राप्त झाली.

या तक्रारीची दखल घेत नगरपरिषद प्रशासक निलेश गौड यांनी टिल्लू पंप धारकावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार शहरातील वॉर्ड क्रं.1, 2, 3, 5, 6 येथे पाणी पुरवठा पथका द्वारे धाड टाकून 21 टिल्लू पंप जप्त करण्यात आले.

सदर कारवाई पाणी पुरवठा अधिकारी अमर लाड यांच्या मार्गदर्शनाखाली हरी जोगी, अशोक रसाळ, सचिन चिकणकार, बंडू आसपवार, लक्ष्मी येरावार,अनुराधा फाये यांनी केली. नागरिकांनी टिल्लू पंपचा वापर करू नये असे आवाहन नगरपरिषद प्रशासनाने केले आहे.