आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या माध्यमातून घुग्घुस येथील राजीव रतन व प्राथमिक आरोग्य केंद्रात ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर भेट

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांचा हस्ते लोकार्पण

चंद्रपूर : घुग्घुस येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मा.आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या माध्यमातून दिलेल्या एका ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीनचे कोविड रुग्णांन साठी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
नंतर वेकोलीच्या राजीव रतन केंद्रीय चिकित्सालयात  आ. मुनगंटीवार यांच्या माध्यमातून दिलेल्या एका ऑक्सिजन कॉन्सट्रेटर मशीनचे कोविड रुग्णांन साठी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

यावेळी देवराव भोंगळे यांनी वेकोलीच्या राजीव रतन केंद्रीय चिकित्सालयातील RT-PCR केंद्रास भेट देऊन पाहणी केली. भोंगळे म्हणाले कोविडच्या दुसऱ्या लाटे मध्ये भाजपाच्या आ.सुधीरभाऊ यांच्या माध्यमातून जिल्ह्यात आरोग्य सुविधा पूर्वीण्याचा प्रयत्न होत आहे. व्हेंटिलेटर, बायपॅक, पीपीइ किट, रुग्णवाहीका, रेमडेसिवीर लस व ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन उपलब्ध करून नागरिकांन पर्यंत पोहचविण्यात येत आहे.

सध्या कोरोना महामारीत ऑक्सिजनच्या कमतरते मुळे अनेक लोकांचे जीव जात आहे. त्याअनुषंगाने घुग्घुस येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व वेकोलीच्या राजीव रतन केंद्रीय चिकित्सालयात आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या माध्यमातून दिलेल्या ऑक्सिजन कॉन्सट्रेटर मशीनचे कोरोना रुग्णान करिता लोकार्पण करण्यात येत आहे.

यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, जिप माजी समाजकल्याण सभापती, नकोडा क्षेत्राचे जिप सदस्य ब्रिजभूषण पाझरे, भाजपा शहराध्यक्ष विवेक बोढे, माजी पंस उपसभापती निरीक्षण तांड्रा, माजी सरपंच संतोष नुने, घुग्घुस प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. परमेश्वर वाकदकर, वेकोलीचे एरिया सेल्स मॅनेजर संजय विरमलवार, राजीव रतन केंद्रीय चिकित्सालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.डि.सी. आनंद, डॉ.चंद्रशेखर चौधरी, डॉ. नवनीत, डॉ.शंभरकर, डॉ.नूतन लता, डॉ. पावणी, डॉ. आदित्य वेदान्त, भाजपा नेते विनोद चौधरी, साजन गोहणे, सिनू इसारप, माजी तंमुस अध्यक्ष हसन शेख, श्रीनिवास कोत्तूर, कामगार नेते दीपक जैस्वाल, वेकोलीचे सुरक्षा अधिकारी सुदर्शन बल्लेवार उपस्थित होते.