वाघासोबत झालेल्या झुंजीत बिबट ठार

• भद्रावतीतील आयुध निर्माणीतील घटना

चंद्रपूर : चंद्रपूर-नागपूर महामार्गावर भद्रावती तालुक्यातील टाकळी गावाजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट ठार होण्याच्या घटनेची शाही वाळत नाही तोच वाघासोबत झालेल्या झुंजीत बिबट ठार झाल्याची घटना आज गुरूवारी घडल्याने वन्यजीवप्रेमींमध्ये चिंता वाढली आहे.

प्राप्त माहितीनुसार, भद्रावती येथील आयुध निर्माणीच्या वसाहतीत आज दि.१९ आॅगस्ट रोजी बिबट मृतावस्थेत आढळून आले.याबाबत वनविभागाला माहिती मिळताच भद्रावती वनपरिक्षेत्र अधिकारी शेंडे आपल्या सहका-यांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. सदर बिबट हा नर प्रकारचा असून ७ ते ८ वर्षे वयाचा आहे. पट्टेदार वाघासोबत झालेल्या झुंजीत तो ठार झाल्याचे सांगण्यात येत आहे. पुढील तपास भद्रावतीचे वन परिक्षेत्र अधिकारी शेंडे करीत आहे.