अवैध रेती वाहतूक करणाऱ्या व्यावसायिकांवर SDPO नेपानी यांची मोठी कारवाई

तीन हायवा ट्रक वनदीतील बोट व प्रोकल्यान जप्त

चंद्रपूर : वरोरा तालुक्यात अवैध धंद्याला उधाण आले असताना आता नव्याने रुजू झालेल्या उपविभागीय पोलीस अधिकारी नोपानी यांनी त्या अवैध धंद्यावर अंकुश लावण्यास सुरुवात केली आहे. गोपनीय माहितीच्या आधारे काल रात्रीला 10 च्या सुमारास त्यांनी स्वता बोरी वडकेश्वर रेती घाटावर धाड टाकून रेतीचा अवैध उपसा होत असताना बोटी, हायवा व प्रोकल्यान जप्त करून ड्रायव्हरला ताब्यात घेतले असल्याने एकच खळबळ उडाली आहे. सदर सर्व हायवे ट्रक वरोरा येथील असून त्यांचे वर कारवाई सुरू असल्याचे समजते.

राजकीय वरदहस्त असल्याने काही रेती माफिया अवैधपणे रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन वर्धा नदीतून मोठ्या प्रमाणात बोटीच्या साह्याने रेती उपसा करून ती रेती वरोरा व यवतमाळ येथील बाजारात विकत होते.हा प्रकार अनेक दिवसांपासून सुरू होता मागील चार महिन्यापूर्वी बोरी गावातील लोकांनी आंदोलन केले होते व पाऊस असल्याने तात्पुरत्या स्वरूपात बंद झाले होते. तसेच उत्खनन झालेल्या खोल पाण्यात एका गुराख्याचा मृत्यू सुद्धा झाला होता.

पुन्हा अवैध रेती उत्खनन सुरू होऊन रात्रीच्या वेळी वाहतूक सुरू झाली होती ही बाब नव्याने रुजू झालेले उपविभागीय पोलीस अधिकारी नोपाणी यांच्या लक्षात येताच त्यांनी ही धडक कारवाई केली.उपविभागीय पोलीस अधिकारी नोपानी यांच्या या धाडसी कारवाई ने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे, कारण आतापर्यंत जे अधिकारी होते त्यानी केवळ सर्वसामान्य लोकांच्या रेतीच्या गाड्या पकडल्या पण रेतीमाफियांच्या गाड्याना हात पण लावला नाही त्यामुळे रेती साठा लिलावात घेऊन त्यांच्या टीपी च्या साह्याने खुलेआम अवैध रेतीचा धंदा जो जोरात सुरू होता.हा प्रकार त्यावर उपविभागीय पोलीस अधिकारी नेपानी यांनी हा सर्व प्रकार मार्गी लावल्याने वरोरा शहरात त्यांच्या धाडसी कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.
घटनास्थळावरून बोटी,जेसीबी मशीन जप्त करून तिथे पोलीस बंदोबस्त लावल्याचे व गाड्यांच्या ड्रायव्हरला अटक केल्याची माहिती आहे. आतापर्यंत सुरू असलेल्या अवैध रेतीच्या धंद्याला महसूल अधिकारी असणाऱ्या उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांनी का अंकुश लावला नाही? असा प्रश्न जनता विचारत असताना आता उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी स्वता रेती माफियांच्या मुसक्या आवळन्यास सुरुवात केली असल्याने रेती माफियांचे धाबे दणाणले आहे.

एसडीपीओ नोपाणीचा वरोरा तालुक्यात दबदबा

सद्या वरोरा शहरात रात्री 10 पूर्वी सर्व बाजारपेठ बंद झाली पाहिजे, सर्व पानठेले बंद झाले पाहिजे ह्याकरिता रोज त्यांचे पेट्रोलिंग सुरू आहे, तसेच तालुक्यातील अवैध दारू व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करणे व आता अवैध रेती व्यवसायिकावर कारवाई सुरू करण्यात आली असल्याने सर्व अवैध धंदा करणाऱ्या चे धाबे दणालले आहे.

शाळकरी विद्यार्थ्यांना व लगतच्या वाहनचालकांना रेती वाहतुकीचा धोका

बोरी ते माढेळी रोडवरून माढेळी येथील विद्यालयात शिकण्यासाठी सायकल किंवा ऑटो ने विद्यार्थ्यांना जावे लागते. रस्ता पूर्णपणे उखडला असून रस्त्याला असलेले पूल सुद्धा अवजड वाहनाने खचून गेले आहे, तसेच वेगाने जाणाऱ्या अवजड वाहनांचा ताबा कधीकधी सुटून सायकलने जाणाऱ्या विद्यार्थी सुद्धा ट्रक मध्ये सापडण्याची दाट शक्यता असून या पूर्वी अनेकदा धोका निर्माण झाला असून याबाबत गावकऱ्यांनी सदर अवैध रेती ट्रकची वाहतूक बोरी रोडवरून करू नये. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदने दिली परंतु कोणत्याही निवेदनाची तात्पुरती दखल घेतली व पुन्हा अवैध वाहतूक सुरू झाल्याने रोडची दुरुस्ती झाली तर नाहीच त्यामुळे रोड राहिलाच नाही तर खड्याचा रोड झाला असल्याने जाणे येणे करणे कठीण झाले आहे त्यामुळे माढेळी भागातील लोकांनी कोणाला न्याय मागावा हा प्रश्न निर्माण झाला आहे.